शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्याच दिवशी वधूला गाठावे लागले पोलीस ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 05:11 IST

७० हजार हुंडा द्या नाहीतर लग्न मोडेल, अशी धमकी दिली. वडीलांनी जावयासह सासू सास-यांचे पाय धरले. लगेच पैसे कुठून आणायचे. थोडा वेळ द्या.. अशी विनवणी केली. नव-याच्या आईने मुलीच्या आईच्या कानशिलात लावली आणि तेथून निघून गेले. मात्र मांडवात रडण्यापेक्षा वधूने थेट...

- मनीषा म्हात्रेमुंबई  - साखरपुड्यानंतर लग्नाची तारिख ठरली. मांडव सजला. वडिलांनी कर्ज काढून दागिने, घरातील सर्व वस्तू भेटीत दिल्या. मंगळसूत्र घालण्यापूर्वी सासूने हॉलसह, दिलेल्या भेट वस्तूंना नावे ठेवण्यास सुरुवात केली. ७० हजार हुंडा द्या नाहीतर लग्न मोडेल, अशी धमकी दिली. वडीलांनी जावयासह सासू सास-यांचे पाय धरले. लगेच पैसे कुठून आणायचे. थोडा वेळ द्या.. अशी विनवणी केली. नव-याच्या आईने मुलीच्या आईच्या कानशिलात लावली आणि तेथून निघून गेले. मात्र मांडवात रडण्यापेक्षा वधूने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.’ याप्रकरणी मालाड पोलिसांनी नव-यासह त्याच्या वडीलांना बेड्या ठोकल्या आहेत. महिलादिनाच्या पूर्वसंध्येला अशी घटना घडणे खेदजनक आहे.जोगेश्वरीत १९ वर्षीय नेहा (नावात बदल) आई, वडील आणि भावासोबत राहते. वडीलांचा भाजी विक्रीचा व्यवसाय.नेहासाठी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये कळव्यातील आशिष गुप्ताचे (२२) स्थळ आले. १४ नोव्हेंबरला पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगा उच्चशिक्षित असल्याने १९ जानेवारीला साखरपुडा पार पडला. तेव्हा सर्व खर्च नेहाच्या वडीलांनीच केला. ५ मार्च रोजी लग्नाची तारिख ठरली. ठरल्याप्रमाणे वधूकडच्यांनी मानपान, नातेवाईकाचा पाहुणचार करायचा, लग्नाचा हाँल व जेवणाचा खर्चही करायचा असे ठरले नेहाच्या वडीलांनी होकार दिला.मालाड पश्चिमेकडील कोळी समाज हॉल बुक केला. मुलीसाठी दागिने तसेच घरच्या सर्व वस्तू भेट म्हणून दिल्या. ५ मार्चला सहा वाजता लग्नाचे विधी सुरू झाले. त्यातच अंतिम टप्प्यात ८ च्या सुमारास नव-या मुलाची आई शिवकुमारी हिने हॉलला नावे ठेवत वधूला दिलेल्या वस्तू फेकण्यास सुरुवात केली.’हमने लडकियो को बहुत दहेज दिया है, आप लोगो को भी हमें दहेज देना पडेगा’ म्हणत ७० हजाराचा हुंडा द्या, नाहीतर लग्न होणार नाही, अशी धमकी दिली. नेहाच्या वडीलांनी त्यांचे पाय धरले. आधीच मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतले. त्यात आणखीन पैसे कसे उभे करायचे. थोडा वेळ द्या..जावयाचेही पाय धरले. मात्र त्यानेही नकार दिला. पैसे देत नाही म्हणून नवरोबानेही मंगळसूत्र घालण्यास नकार दिला. पाय धरुन विनंती करत असताना नवºयाच्या आईने नेहाच्या आईच्या कानशिलात लगावली. आणि नव-यानेही त्यांना धक्काबुकी केली. आणि तिघेही निघून गेले.रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरु होता. अखेर मध्यरात्री दोनच्या सुमारास नेहाने वडीलांना पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांच्या तक्रारीवरुन मालाड पोलिसांनी नवरा आणि त्याच्या आई वडीलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुधीर महाडीक यांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नवरा आणि त्याच्या वडीलांना हुंड्याच्या गुन्ह्यांत अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे महाडीक यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबई