शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

समृद्ध जीवनच्या लिना मोतेवार यांना पोलीस कोठडी

By admin | Updated: August 11, 2016 20:51 IST

समृद्ध जीवन फुडस इंडिया या कंपनीची संचालक लिना महेश मोतेवार यांनी पुण्यातील सराफाकडून एकूण १ कोटी ६२ लाख रुपयांचे सोने, चांदी, हि-यांच्या दागिन्यांची

ऑनलाइन लोकमत
 
पुणे, दि. 11 -  समृद्ध जीवन फुडस इंडिया या कंपनीची संचालक लिना महेश मोतेवार यांनी पुण्यातील सराफाकडून एकूण १ कोटी ६२ लाख रुपयांचे सोने, चांदी, हि-यांच्या दागिन्यांची खरेदी केली असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषणने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे़ महेश मोतेवारलाअटक झाल्यानंतर त्या दुसºयाच्या नावावर भाड्याने घेतलेल्या घरात रहात असल्याची माहिती  मिळाल्यावर सीआयडीने बुधवारी त्या ठिकाणाहून अटक केली़ विशेष न्यायालयाने अधिक तपासासाठी लिना मोतेवार यांना २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ 
समृद्ध जीवन फुड इंडिया या कंपनीविरुध्द राज्यातील विविध जिल्ह्यासह अनेक राज्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत़  सर्व आर्थिक गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे़ चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात सीआयडीने लिना मोतेवार (वय ३७, रा़ विद्यादीप सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी) यांना अटक केली़ या प्रकरणात महेश मोतेवार आणि राजेंद्र भंडारी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस़ जे़ काळे यांच्या न्यायालयात सीआयडीने गुरुवारी लिना मोतेवार यांना हजर केले़ अतिरिक्त जिल्हा सरकारी वकिल सुनिल हांडे यांनी सांगितले की,  लिना मोतेवार या कंपनीची ५० टक्के शेअर होल्डर होती़ २०१३ मध्ये त्यांच्याकडे १ लाख ६२ हजार ५०० शेअर्स असून त्यापैकी हा १७़११ टक्के हिस्सा आहे़  कंपनीच्या वाहनचालकाच्या घरी ठेवलेले १ कोटी रुपयांचे दागिने आरोपीचे असून त्याबाबत तपास करायचा आहे़ धनकवडी येथील घरात आरोपीच्याच फिंगर प्रिंटने लॉकर उघडले जाऊ शकते अशीच आणखीही लॉकर असण्याची शक्यता आहे. महेश मोतेवार अटकेत असताना आरोपीने कंपनीशी निगडीत असलेल्या विविध मालमत्ताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत़  कंपनीने त्यांना २००८-०९ ते २०१३ -१४ दरम्यान २० कोटी रुपयांचे कर्ज व अग्रीम स्वरुपात देण्यात आले आहे़ तसेच पगाराच्या स्वरुपात ६३ लाख रुपये दिले आहेत़ या रक्कमा कोणत्या उद्देशाने दिल्या, याचा तपास करायचा आहे़ गुंतवणुकदारांकडून गोळा केलेल्या पैशातून स्वत: करीता, कुंटुबाकरीता स्थावर मिळकती, जंगम मालमत्ता खरेदी केली आहे, त्याचा तपास करायचा आहे़ वेगवेगळ्या राज्यात गुंतवणुक केली आहे़ त्याचा तपास करायचा आहे़ 
आरोपी वापरत असलेली मोटार कंपनीच्या नावावर आहे़ त्या स्वत:ची ओळख लपवत असल्याने वारंवार शोधूनही त्या सापडल्या नाहीत़ त्यामुळे न्यायालयाकडून वॉरंट मिळविले होते़ समृद्ध जीवन फुडसच्या मालमत्ताची माहिती, कंपनीचे संचालक, बेनामी, नातेवाईक इत्यादींच्या नावे कुठे कुठे मालमत्ता आहेत व ते विकत घेण्यासाठी पैसे कोठून व कशा प्रकारे ट्रान्सफर झाले याबाबत तपास करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले़ न्यायालयाने अधिक तपासासाठी २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ 
 
सीआयडी तपासात पुढे आलेली माहिती...
* समृद्ध जीवन फुडस कंपनीची लिना मोतेवार ५० टक्के शेअर होल्डर
* तीन प्रमुख शेअर होल्डरपैकी एक
* महेश मोतेवार यांच्या अटकेनंतर कंपनीची मालमत्ताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न
* संचालक असलेल्या लिना मोतेवार यांना कंपनीनेच दिले २० कोटी रुपये कर्ज 
* अनेक राज्यात दाखल आहेत गुन्हे
* कंपनीच्या ग्राहकांची संख्या व उपलब्ध लाईव्ह स्टॉकची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत
* समृद्ध जीवनच्या गु्रपमधील अनेक कंपनीत त्या संचालक
* पुण्यातील प्रसिद्ध सराफाकडील खाते उताºयानुसार ४४ वेगवेगळ्या व्यवहारातून १ कोटी ६२ लाख रुपयांची सोने, हिºयाच्या दागिन्यांची खरेदी