गोंदिया : पोलीस दलात कार्यरत कर्मचार्याची सुटी मंजूर करण्यासाठी २00 रूपयांची लाच मागणार्या गोंदियाच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. सोमवारी (दि.८) ही कारवाई करण्यात आली.सविस्तर असे की, या प्रकरणातील तक्रारकर्त्या पोलीस कर्मचार्यास धार्मिक व वैयक्तिक कामासाठी आपल्या गावी जायचे असल्याने रजेची आवश्यकता होती. त्यांनी प्रभारी अधिकार्यांची स्वाक्षरी घेऊन १५ दिवसांच्या अजिर्त रजा मंजुरीचा अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपीक अनिल बसू ग्यानचंदानी (४३) याच्याकडे दिला. तेव्हा ग्यानचंदानी याने त्यांना १५ सप्टेंबरपासून १५ दिवसांची रजा मंजूर करण्यासाठी २00 रूपयांची मागणी केली. पैसे मिळाल्याशिवाय रजेचा अर्ज स्वीकारणार नाही व रजा मंजूर करणार नाही, असे स्पष्ट सांगितले.त्यामुळे तक्रारकर्त्या कर्मचार्याने ३ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. त्या तक्रारीच्या आधारे विभागाने पडताळणी करण्यासाठी पंचांना तक्रारकर्त्यासोबत ग्यानचंदानी यांच्या कार्यालयात पाठविले. त्यावेळीही ग्यानचंदानी याने पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने पुढील कारवाईसाठी सापळा लावण्याचे ठरले. मात्र ग्यानचंदानीला शंका आल्याने त्याने तक्रारकर्त्याकडून पैसे स्वीकारले नाही. मात्र त्याने २00 रूपयांपेक्षा अधिक रकमेची मागणी करून ती लाच स्वीक ारण्याची तयारी दशर्विल्याने त्या आधारे ग्यानचंदानी याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दीनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, शिवचरण पेठे, हवालदार दिवाकर भदाडे, गोपाल गिर्हेपुंजे, दीपक दत्ता, नायक राजेश शेंद्रे, योगेश उईके, शेखर खोब्रागडे, देवानंद मारबते, महिला शिपाई तनुजा मेश्राम यांनी केली. (शहर प्रतिनिधी)
पोलिसाला पैसे मागणार्या लाचखोर लिपिकाला अटक
By admin | Updated: September 9, 2014 05:09 IST