खिशात झाला मोबाईलचा स्फोट, तरुण जखमी

By Admin | Updated: October 13, 2016 23:38 IST2016-10-13T23:38:09+5:302016-10-13T23:38:09+5:30

सध्याच्या युगात मोबाईलशिवाय जगणं अशक्य आहे. मात्र या मोबाईलचा स्फोट होऊन एका तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे.

In the pocket the mobile explosion and the young injured | खिशात झाला मोबाईलचा स्फोट, तरुण जखमी

खिशात झाला मोबाईलचा स्फोट, तरुण जखमी

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 13 - सध्याच्या युगात मोबाईलशिवाय जगणं अशक्य आहे. मात्र या मोबाईलचा स्फोट होऊन एका तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. शहापुरात ही घटना घडली आहे. खिशात ठेवलेल्या कार्बन मोबाईलचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी
झाला. शहापूर तालुक्यातील वाशिंद गावातील करण ठाकरे हा तरुण मित्रांसोबत घरी जात होता. त्यावेळी करणच्या खिशातील मोबाईलचा स्फोट झाला.
मोबाईलच्या स्फोटामुळे करणच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करणच्या घरची परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे कंपनीविरोधात तक्रार करून करणला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

Web Title: In the pocket the mobile explosion and the young injured