शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

अलिबागमधील पीएनपी नाट्यगृह खाक; जीवितहानी नाही, लाखोंचे नुकसान, आगीवर नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 11:18 IST

पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या नाट्यगृह बुधवारी दुपारी आगीत जळून खाक झाले.

अलिबाग :

येथील पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या नाट्यगृह बुधवारी दुपारी आगीत जळून खाक झाले. आगीत साऊंड सिस्टीम, खुर्च्या व अन्य साहित्य भस्मसात होवून लाखो रुपयांच्या  साहित्याचे नुकसान झाले. ज्वालांनी रौद्ररूप धारण  केल्याने भिंतीला तडे  जावून  तुटून पडल्या.  सुमारे अडीच तास आग धुमसत होती. आगीच्या धुराच्या लोटांनी परिसर व्यापून टाकला होता. चोहोबाजूंनी आगीने घेरलेल्या नाट्यगृहाला वाचविण्याचे अग्निशमन दलाच्या जवानांचे  प्रयत्न तोडके पडत होते.

अलिबाग- पेण  मुख्य मार्गावर असलेल्या पीएनपी नाट्यगृहात  किरकोळ दुरुस्तीचे काम सुरू होते. दुपारी सव्वाचारच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आगीने पेट घेतला. कामगारांनी आरडाओरड केल्यानंतर या प्रकाराची भीषणता दिसून आली. नाट्यगृहातील फोमच्या खुर्च्या, पडदे, गालिच्यांमुळे आग वेगाने पसरत गेली. नाट्यगृहाच्या छतामधून बाहेर पडणारा धूर आणि ज्वालांनी भिंतीला तडे जाऊन कोसळले. धुराचे लोट पाहून नागरिकांची एकच गर्दी झाली होती.सव्वासहाच्या सुमारास पावसाची हजेरी- सुरुवातीला आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची एकच गाडी आली होती. मात्र आगीची व्याप्ती लक्षात घेऊन दुसरी गाडी मागविण्यात आली. - पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होते. परंतु, ते तोडके पडत होते. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील दुकाने बंद करून तेथून नागरिकांना बाहेर काढले. - नाट्यगृह बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आतील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सव्वा सहाच्या सुमारास पाऊस सुरू झाल्याने आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.

या इमारतीमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :fireआगalibaugअलिबाग