शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाला नॅकचे ए-प्लस प्लस मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 14:26 IST

Shivaji University Kolhapur- राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्या वतीने (नॅक) शिवाजी विद्यापीठाला ए-प्लस प्लस असे मूल्यांकन बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आले. या मूल्यांकनातून विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिध्द झाली आहे.

ठळक मुद्दे शिवाजी विद्यापीठाला नॅकचे ए-प्लस प्लस मानांकनविद्यापीठाचे मूल्यांकन जाहीर

कोल्हापूर : राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्या वतीने (नॅक) शिवाजी विद्यापीठाला ए-प्लस प्लस असे मूल्यांकन बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आले. या मूल्यांकनातून विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिध्द झाली आहे.नॅक मूल्यांकन समितीचे अध्यक्ष मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जे. पी. शर्मा, सदस्य सचिव डॉ. बी. आर. कौशल (बेंगलोर), डॉ. एसएएच मुनोद्दीन (पश्चिम बंगाल), डॉ. तरुण अरोरा भटिंडा (पंजाब), डॉ. सुनीलकुमार (दिल्ली), डॉ. हरीश चंद्रादास (मेघालय) यांनी शिवाजी विद्यापीठाला दि. १५ ते १७ मार्च या कालावधीत भेट देवून मूल्यांकन केले.

संख्यात्मक आणि विश्लेषणात्मक अशा दोन टप्प्यांमध्ये नॅक मूल्यांकन त्यांनी केले. त्यातील ७० टक्के संख्यात्मक माहिती नॅकला सादर केली आहे. उर्वरित ३० टक्के विश्लेषणात्मक मूल्यांकनासाठी या समितीने विद्यापीठाला भेट दिली होती. या समितीने पाहणीचा अहवाल बेंगलोर येथील नॅकला सादर केला होता.

त्यानंतर पुढील प्रक्रिया होवून नॅकच्यावतीने विद्यापीठाचे मूल्यांकन जाहीर करण्यात आले. त्यात विद्यापीठाला ३.५२ सीजीपीएससह ए-प्लस प्लसअसे मूल्यांकन मिळाले आहे. या मानांकनाबद्दल विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, आदी घटकांनी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, आदींवर दूरध्वनीवरून शुभेच्छांचा वर्षाव केला.

शिवाजी विद्यापीठाला नॅकचे ए-प्लस प्लस हे मानांकन मिळाल्याचा खूप आनंद आहे. विद्यापीठाच्या प्रत्येक घटकाने दिलेल्या योगदानामुळे हे मानांकन मिळाले आहे. मानांकनाबाबतच्या या यशाचे सर्व श्रेय या घटकांचे आहे.-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर