शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: गंभीर कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची मात्रा; महाराष्ट्रात जगातील सर्वांत मोठी ट्रायल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 06:41 IST

२१ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये होणार प्रयोग

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिवीर या औषधाची ट्रायल सुरू होत असतानाच आता प्लाझ्मा थेरपीच्या साहाय्याने रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी राज्याला मिळाली आहे. २१ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हल कोरोना व्हायरस असेसमेंट) ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ५०० रुग्णांवर उपचार होतील. याचे यश आजमावल्यावर या थेरपीची पुढील दिशा ठरेल.एवढ्या व्यापक स्वरूपात या थेरपीची ट्रायल घेणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसनिर्मितीचे जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असले तरी ती लस आणखी काही महिने तरी दृष्टिपथात नाही. त्यामुळे औषधोपचारांच्या अन्य प्रयोगांच्या बरोबरीनेच प्लाझ्मा थेरपीच्या उपयुक्ततेच्या चाचण्या अनेक देशांमध्ये सुरू आहेत.महाराष्ट्र सरकारला एप्रिल महिनाअखेरीस मर्यादित स्वरूपात या थेरपीसाठी परवानगी मिळाली होती. मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर येथे १६ रुग्णांवर त्या ट्रायल झाल्या असून, त्यात संमिश्र यश प्राप्त झाले आहे. प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्या व्यापक स्वरूपात करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नागपूर मेडिकल कॉलेजने राज्य सरकारच्या माध्यमातून सेंट्रल ड्रग अथॉरिटीकडे केली होती. दोन दिवसांपूर्वी नागपूरसह राज्यातील २१ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ते प्रयोग करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा देऊन त्यांच्या प्रतिकारशक्तीत या थेरपीच्या माध्यमातून सुधारणा केली जाते. प्लाझ्मामधील रक्तपेशींमध्ये अ‍ॅण्टिबॉडीजदेखील (प्रतिजैवीक) असतात. त्या आजारास कारणीभूत ठरणाऱ्या पेशींना प्रतिकार करून परतवून लावण्याचा प्रयत्न करतात. त्यात यश आले की पुन्हा तशाच रोगाचे आक्रमण झाले तर रक्तपेशी त्याला वेळीच प्रतिकार करतात.गंभीर आजारावरील रुग्ण त्या थेरपीला प्रतिसाद देत असल्याचा दावा संशोधकांकडून केला जात आहे. कोरोनामुक्त झालेल्या आणि २८ दिवस विलगीकरणात असलेल्या व्यक्तीला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसतील तर त्याचे रक्त या थेरपीच्या चाचणीसाठी घेतले जाणार आहे. तत्पूर्वी त्या दात्याच्या तीन स्वॅब टेस्ट निगेटिव्ह याव्या लागतील. तसेच, त्या रक्तात कोरोनाला प्रतिकार करणाऱ्या अ‍ॅण्टिबॉडीजसुद्धा असाव्या लागतील.राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायल आपण सुरू करतोय. ज्या रुग्णांमध्ये कमी गंभीर स्वरूपाची लक्षणे आहेत; परंतु, उपचारांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचा आजार गंभीर रूप धारण करू शकतो त्यांच्यासाठी ही थेरपी प्रभावी ठरत असल्याचे काही ठिकाणी संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यानुसार या ट्रायल महाराष्ट्रात केल्या जाणार आहेत. प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये २० ते ३० रुग्णांची निवड या थेरपीसाठी केली जाईल. त्यांच्यावरील उपचारांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर सखोल संशोधन होईल. त्यानंतर ही थेरपी उपयुक्त ठरत असेल तर त्याच्या वापराबाबतचे निर्णय घेतले जातील. - डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या