शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

राज्यातील सिंचन 40 टक्क्यांपर्यंत नेण्याचा संकल्प, राज्यात दोन नदीजोड प्रकल्प - गडकरीची घोषणा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 20:23 IST

राज्यातील सिंचनाखालील जमीन 40 टक्क्यांपर्यंत नेण्याचा संकल्प आम्ही केला असून, त्यासाठी येत्या दोन वर्षांत 55 ते 60 हजार कोटी रुपयांचा निधी आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात दोन नदीजोड प्रकल्प सुरू करण्याचा विचार सुरू आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

मुंबई, दि. 8 -  राज्यातील सिंचनाखालील जमीन 40 टक्क्यांपर्यंत नेण्याचा संकल्प आम्ही केला असून, त्यासाठी येत्या दोन वर्षांत 55 ते 60 हजार कोटी रुपयांचा निधी आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात दोन नदीजोड प्रकल्प सुरू करण्याचा विचार सुरू आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. शुक्रवारी झालेल्या जलसिंचन आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी गडकरी यांनी ही माहिती दिली. राज्यातील आणि देशातील जलसिंचन आणि पाणीप्रश्नाबाबत बोलताना गडकरी म्हणाले,''राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र 40 टक्क्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्यासाठी येत्या दोन वर्षांत 55 ते 60 हजार कोटी रुपये आणण्याचा माझा प्रयत्न आहे." महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाविषयी माहिती देताना गडकरींनी सांगितले की, देशात नदीजोड प्रकल्पावर विचार सुरू आहे. त्यात राज्यात दोन नदीजोड प्रकल्पांबाबत चर्चा सुरू आहे. या दोन प्रकल्पांसाठी दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे प्रकल्प पूर्णत्वास आल्यास मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा पाणीप्रश्न सुटू शकेल, असेही गडकरींनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जलसिंचन प्रकल्पांबाबत माहिती देताना सांगितले की,"प्रधानमंत्री योजनेंतर्गत राज्यात 26 प्रकल्प सुरू आहेत. या 26 प्रकल्पांपैकी पाच प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. तसेच राज्यातील रस्तेप्रकल्पांसाठी केंद्राकडून  भरघोस निधी उपलब्ध झाला आहे." 

वर्सोवा येथे नवीन पूल उभारणार यावेळी राज्यातील रखडलेल्या रस्ते प्रकल्पांविषयी बोलताना गडकरींनी मुंबईतील बऱ्याचा काळापासून रेंगाळलेला वर्सोवा येथील पूल लवकरच उभारण्यात येईल, असे सांगितले. तसेच सध्या सुरू असलेले मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण 2018 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.  

 

सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणासाठी संशोधन संस्थांचे योगदान महत्वाचे- नितीन गडकरी

देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्यासाठी संशोधन संस्थांनी योगदान देणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवतेचा स्विकार करून परवडणारी, सहज उपलब्ध होणारी आणि सुरक्षित, प्रदूषणमुक्त वाहतूक सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, रस्ता वाहतूकीसंदर्भात संशोधन करणाऱ्या संस्थांनी लंडनमधील सार्वजनिक वाहतूकसेवेचा अभ्यास करून, देशातील सार्वजनिक वाहतूकीत बदल घडवून आणावेत, असे मत केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.  पिंपरी-चिंचवड मधील सेंट्रल इन्स्टिटयुट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट संस्थेच्या (सीआयआरटी) सुवर्ण महोत्सवी समारंभानिमित्त आयोजित केलेल्या सुरक्षित आणि सार्वजनिक वाहतूक या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, ‘सार्वजनिक वाहतुकीसंदर्भातील परिसंवादात संवाद आणि चर्चा करण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी आयोजित राष्ट्रीय परिसंवादात सहभागी झालो आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी सीआयआरटीसारख्या संशोधन संस्थांचे सहकार्य आणि योगदान हवे आहे. आज राज्य परिवहन संस्थांसाठी कठीण कालखंड आहे, असे जरी असले तरी या संस्था सर्वसामान्य गरीब जनतेची सेवा करण्याचे काम करीत आहे. आता या संस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. त्यांनी इनोव्हेशन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक वाहतूक सेवेत बदल घडवून आणण्याची गरज आहे.’’ 

 

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGovernmentसरकार