शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

संघटित क्षेत्राच्या धर्तीवर वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी योजना

By admin | Updated: January 7, 2015 01:06 IST

संघटित क्षेत्राप्रमाणेच वृत्तपत्र विक्रेत्यांना सरकारच्या माध्यमातून लाभ देणाऱ्या योजना सुरू करण्याचा प्रयत्न करू, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पकृतीचे’ लोकार्पणनागपूर : संघटित क्षेत्राप्रमाणेच वृत्तपत्र विक्रेत्यांना सरकारच्या माध्यमातून लाभ देणाऱ्या योजना सुरू करण्याचा प्रयत्न करू, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.नागपूरच्या ऐतिहासिक संविधान चौकात लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने साकारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पकृतीचे’ लोकार्पण ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते गजानन मेश्राम यांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यानंतर झालेल्या समारंभात मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते गजानन मेश्राम उपस्थित होते. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा सदस्य खा. विजय दर्डा, लोकमत मीडिया प्रा.लि.चे कार्यकारी संचालक करण दर्डा यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.पत्रकारदिनाचे औचित्य साधून ऐतिहासिक संविधान चौकात झालेल्या या कार्यक्रमाला राज्यभरातील शेकडो वृत्तपत्र विक्रेते बंधू उपस्थित होते. या ऐतिहासिक शिल्प साकारण्याच्या कल्पनेचे आणि शिल्पकाराचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी अभिनंदन केले.प्रास्ताविक भाषणात खा. विजय दर्डा यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सन्मानाचा मुद्दा मांडला होता. तोच धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्र विक्रेते करीत असलेल्या परिश्रमाचा गौरवपूर्ण उल्लेख करीत त्यांच्यासाठी संघटित क्षेत्राप्रमाणेच लाभ देणाऱ्या काही योजना सरकारकडून सुरू करण्याचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान देऊन समाजातील शेवटच्या घटकाला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न केला. त्याच संविधानाचे नाव असलेल्या चौकात समाजाच्या शेवटच्या घटकाचे प्रतीक असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्याचे शिल्प उभारण्यात आले व तेही पत्रकारदिनाच्या दिवशी हा एक विलक्षण योगायोग आहे. यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाने घेतलेला पुढाकार हा ऐतिहासिक आणि प्रशंसनीय आहे. ‘लोकमत’ने यापुढेही अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवावेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.वृत्तपत्र विक्रेत्याचे समाजातील महत्त्वाचे स्थान विशद करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या दिवशी वर्तमानपत्र येत नाही त्या दिवशी विक्रेत्याचे महत्त्व कळते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात संकेतस्थळावर वर्तमानपत्र उपलब्ध होण्याची सोय आहे. पण तो नाईलाज असतो. घरी बसून वर्तमानपत्र वाचण्याची मजा काही वेगळीच असते.प्रास्ताविक करताना खा. विजय दर्डा यांनी वृत्तपत्र आणि विक्रेत्यांचे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्व विशद केले. स्वातंत्र्यपूर्व काळात वर्तमानपत्र प्रसिद्ध करणे व ते वितरित करणे अवघड होते. अशाही काळात विक्रेत्यांनी हिंमत दाखवून घरोघरी वर्तमानपत्र पोहोचविण्याचे काम केले, ते देशभक्तीचेच प्रतीक ठरते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही बळकट करण्यासाठी वृत्तपत्राची जेवढी महत्त्वाची भूमिका आहे तेवढीच विक्रेत्यांचीही आहे. त्याला सलाम करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असे दर्डा म्हणाले. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याचाही त्यांनी निषेध केला. लोकमततर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमांची आणि कल्याणकारी योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.सुरुवातीला मुख्यमंत्री व खा. विजय दर्डा यांच्या हस्ते ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते गजानन मेश्राम यांचा शाल, श्रीफळ आणि शिल्पाची प्रतिकृती भेट देऊन सत्कार करण्यात आला. शिल्पकार किरण अदाते यांचाही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. करण दर्डा यांनी शिल्पाची प्रतिकृती भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. लोकमत वृत्तपत्र समूहाचे सहाय्यक उपाध्यक्ष (प्रसार) वसंत आवारे यांनी पालकमंत्री बावनकुळे यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन लोकमतचे सहायक संपादक गजानन जानभोर यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील सर्व आमदार, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘हॉकर्स डे’ आणि गुलाब पुष्पज्याप्रमाणे पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी शासकीय पातळीवर ‘पत्रकारदिन’ साजरा केला जातो. त्याच धर्तीवर वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी ‘हॉकर्स डे’ही साजरा करण्यात यावा व या दिवशी विक्रेत्यांचा सन्मान करण्यात यावा. वाचकांनीही या दिवशी घरी आलेल्या विक्रेत्यांना गुलाब पुष्प द्यावे, त्यांना घरी सन्मानाने बसवून चहा द्यावा, अशी कल्पना यावेळी खा. विजय दर्डा यांनी मांडली. या कल्पनेला उपस्थित विके्रत्या बांधवांनी टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.