शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गाड्यांमध्ये हॉर्नच्या जागी ऐकू येणार तबला, बासरी, हार्मोनियमचा आवाज, गडकरी म्हणाले, "प्लॅन तयार करतोय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 11:35 IST

Nitin Gadkari : गाड्यांमध्ये हॉर्न ऐवजी केवळ भारतीय म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्सचे आवाज येतील असा कायदा आणण्याच्या विचारात असल्याची Nitin Gadkari यांची माहिती.

ठळक मुद्देगाड्यांमध्ये हॉर्न ऐवजी केवळ भारतीय म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्सचे आवाज येतील असा कायदा आणण्याच्या विचारात असल्याची गडकरी यांची माहिती.

गाड्यांमध्ये हॉर्न ऐवजी केवळ भारतीय म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्सचे आवाज येतील असा कायदा आणण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली. नाशिक येथे एका महामार्गाच्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी याबाबत माहिती दिली. रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाड्यांमध्ये वापरण्यात येत असलेल्या सायरनचाही विचार केला जात आणि ते आकाशवाणीवर वाजणाऱ्या मधूर धूनमध्ये बदलण्याचा अभ्यास केला जात असल्याचंही ते म्हणाले. 

"आता लाल दिव्याची प्रथा बंद झाली आहे. आता मला हा सायरनही बंद करायचा आहे. रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाड्यांना असलेल्या सायरन बाबात अभ्यास करण्यात येत आहे. एका कलाकारानं आकाशवाणीसाठी एक धून तयार केली आहे आणि ती सकाळी चालवण्यात आली. मी ती धून रुग्णवाहिकेसाठी वापरण्याच्या विचारात आहे, जेणेकरून लोकांनाही त्याची समस्या होणार नाही. विशेषत: मंत्र्यांच्या गाड्या बाजूनं जाताना जो जोरदार आवाज होतो तो अतिशय त्रासदायक असतो, यामुळे कानांनाही त्रास होतो," असं गडकरी म्हणाले. "सध्या मी याचा अभ्यास करत असून यासाठी कायदा तयार करण्याची योजना आखत आहे. कोणत्याही वाहनांमध्ये हॉर्न ऐवजी भारतीय इन्स्ट्रुमेंटचा आवाज येईल. बासरी, वॉयलिन, हार्मोनियम, तबला अशांचा आवाज कानासाठीही चांगला वाटेल," असंही ते म्हणाले.

मुंबई-दिल्ली महामार्गाचं काम सुरू"एक लाख कोटी रूपयांचा मुंबई-दिल्ली महामार्गाचं काम यापूर्वीच हाती घेण्यात आलं आहे. परंतु हा महामार्ग भिवंडीवरून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबईपर्यंत पोहोचलो. वसई खाडीवरही एका महामार्गाचं काम सुरू आहे," असंही त्यांनी नमूद केलं. "सध्या आम्ही वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणारा एक पूल उभारण्याची योडना आखत आहोत. त्यानंतर नरीमन पॉईंटपासून दिल्लीरम्यान अंतर कापण्यास १२ तास लागतील. तसंच यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर येणारा ताणही कमी होईल," असं गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीIndiaभारतcarकार