ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १० - अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या नाशिकच्या १५० भाविकांसह राज्यातील सुमारे साडेचार ते पाच हजार नागरिक काश्मिरमधील बालतालमध्ये अडकून पडले आहेत. विशेष म्हणजे भाविकांसाठी असलेल्या लंगरमधील भोजनव्यवस्थाही संपुष्टात आल्याने भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे या भाविकांनी तेथील प्रशासनाविरूद्ध संताप व्यक्त केला आहे़
अमरनाथ यात्रेसाठी जळगाव येथील अनिल महाजन यांच्यासमवेत (१२), दादर येथील तेजस कारंबे यांच्यासमवेत (८०), श्रीरामपूर येथील सुहास परदेशी यांच्यासमवेत (२०), नागपूर येथील गणेश कोठारी यांच्यासमवेत (१२), कल्याण येथील सतीश कोठेकर यांच्यासमवेत (१६), मुंबईतील लक्ष्मण वारे यांच्यासमवेत (८) तर मालेगावमधील दादाजी शेवाळे यांच्यासमवेत १२ व्यक्ती या अमरनाथ यात्रेसाठी गेल्या आहेत.
दरम्यान, अमरनाथ दर्शनाहून परतणा-या भाविकांनी परतीच्या गाड्यांचे केलेले आरक्षण रद्द होण्याचा मार्गावर आहे. मात्र तरीही तेथील स्थानिक प्रशासन त्यांना पुढे जाऊ देत नसल्याची माहिती हेमंत अगरवाल यांनी लोकमत ऑनलाईनसाठी दिली आहे़