शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र दिनापूर्वी २ लाख घरांना मिळणार पाइपने गॅस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 02:26 IST

राज्यातील २ लाखाहून अधिक घरांना २०१९ च्या महाराष्ट्र दिनापूर्वी पाइपने स्वयंपाकाचा गॅस मिळणार आहे. पंतप्रधान मोदी २२ नोव्हेंबरला दिल्लीत याचे उद्घाटन करणार आहेत.

मुंबई : राज्यातील २ लाखाहून अधिक घरांना २०१९ च्या महाराष्ट्र दिनापूर्वी पाइपने स्वयंपाकाचा गॅस मिळणार आहे. पंतप्रधान मोदी २२ नोव्हेंबरला दिल्लीत याचे उद्घाटन करणार आहेत. अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे.एलपीजी सिलिंडरसाठी लागणाऱ्या गॅसची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने घरांना पाइपने नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाने निविदेच्या आठ फेºया आतापर्यंत पूर्ण केल्या आहेत. नवव्या फेरीत देशातील ८४ व राज्यातील नऊ जिल्ह्यांचा समावेश होता. त्यामधील एकूण २० लाख ५८ हजार ५४३ घरांना पाइपद्वारे हा गॅस पोहोचविला जाईल. भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड व युनिसन एन्वायरो या कंपन्यांना हे कंत्राट मिळाले आहे.भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक राजेंद्र नाटेकर यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी २७० दिवसांत करायची आहे. कंत्राट मिळाल्याच्या दिवसापासून नऊ महिन्यांत किमान १० टक्के घरांमध्ये ही सुविधा देणे बंधनकारक आहे. आता १६० दिवस कंपन्यांच्या हातात आहे. ठरल्यानुसार २ लाख ५ हजार घरांमध्ये हा गॅस पुरवला जाईल.२७० पैकी उरलेले १६० दिवस ३० एप्रिलला पूर्ण होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र दिनाआधी या घरांना पाइपने स्वयंकापाचा गॅस मिळणार आहे. या नऊ जिल्ह्यांमध्ये एकूण ३८१ सीएनजी स्टेशन्ससुद्धा उभे होणार आहेत.रिक्षाचालकांच्या खर्चात होईल बचतस्वयंपाकासाठी नैसर्गिक वायू व वाहनासाठी कंडिशन्स नैसर्गिक वायू (सीएनजी) असा हा संयुक्त प्रकल्प आहे. सीएनजी हे पेट्रोल-डिझेलपेक्षा २० टक्के स्वस्त असल्याने शहरी भागातील रिक्षाचालकाची महिनाकाठी ८ हजार रुपयांची बचत होऊ शकेल.अशीच महिनाकाठी किमान १० टक्के बचत सध्या एलपीजी सिलिंडर वापरणा-या कुटुंबाचीही होईल, असे नाटेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :businessव्यवसाय