शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांच्या’ जगण्याची वेदना समाजासमोर मांडण्याकरिता गुलाबी मेळावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 19:53 IST

प्रस्थापित समाजापासून अद्याप कोसो मैल दूर अंतरावर असणा-या ‘‘त्या’’ समुहाला मुख्य प्रवाहात सामील करुन घेतले जात नाही.

ठळक मुद्देराज्यभरातील एलजीबीटी  समुहाचा  ‘‘गुलाबी मेळावा’’ पुण्यात पार पडणारजागतिक एडस दिन सप्ताहाच्या निमित्ताने येत्या शनिवारी (8) गुलाबी मेळावासमलैंगिक, तृतीयपंथी, व्यक्तींच्या समस्यांविषयी चर्चा करण्यात येणार

पुणे : प्रस्थापित समाजापासून अद्याप कोसो मैल दूर अंतरावर असणा-या  ‘‘त्या’’ समुहाला मुख्य प्रवाहात सामील करुन घेतले जात नाही. एकीकडे भेदाभेद अमंगळ या संतांच्या वचनाचे दाखले देवून समानतेची मांडणी करणारे ’’त्यांच्या’’ बाजुने लढाताना दिसत नाहीत. समानता, बंधुभाव, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक आदरभाव यासारख्या मुल्यांना कें द्रस्थानी ठेवून केवळ शहरातीलच नव्हे तर राज्यभरातील एलजीबीटी  समुहाचा  ‘‘गुलाबी मेळावा’’  पुण्यात पार पडणार आहे. मेळाव्याच्या माध्यमातून त्या समुहातील व्यक्तींच्या सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.  जागतिक एडस दिन सप्ताहाच्या निमित्ताने उडान या संस्थेच्या माध्यमातून येत्या शनिवारी (8) गुलाबी मेळावा कार्यक्रमातून समलैंगिक, तृतीयपंथी, व्यक्तींच्या समस्यांविषयी चर्चा करण्यात येणार आहे. यंदा जनजागृतीपर कार्यक्रमाचे 26 वे वर्ष असून मुंबई, नवी मुंंबई, ठाणे, रायगड आणि पुणे या जिल्हयातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. एडस दिन सप्ताहाचे निमित्त साधत सध्या समाजातील समलैंगिक आणि तृतीयपंथीय यांच्या मुलभूत समस्यांवर त्या समुहातीलच मान्यवर व्यक्ती आपले विचार व्यक्त करणार आहेत. यात निलेश गोरे (चांदणी  गोरे), महेंद्र बनसोडे (लावणी नृत्यांगणा) आणि विजय नायर उपस्थित एलजीबीटीच्या व्यक्तींना मार्गदर्शन करणार आहेत. स्वत:ची ओळख हा विषय घेवून त्यावर आतापर्यंतच्या प्रवासात आपल्याला आलेल्या अडचणीच्या प्रसंग, कटु अनुभव याबाबत ते संवाद साधतील. संवादाच्या माध्यमातून सद्यस्थितीत  ‘‘त्यांच्या’’ समोरील प्रश्नांना योग्य दिशा मिळुन तो प्रश्न मार्गी लागावा हा उद्देश आयोजकांचा असल्याचे चंद्रकांत शिंदे सांगतात.  शनिवारी (८) नाना पेठेतील गंगा प्रेस्टीज आर्केड याठिकाणी होणा-या उत्सव सोहळयात विचारमंथना बरोबरच नृत्य, रांगोळी, मेहंदी या स्पर्धां पार पडणार असून मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. 1992 पासून सुरु झालेल्या उडान संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर लोटल्या गेलेल्या  ‘‘त्यांना’’ आपलेसे करण्याचे काम केले जाते. स्वत:मधील वेगळेपणा, त्याची जाणीव करुन देत  जे आहे ते स्वीकारण्याकरिताचे पाठबळ देण्यात महत्वाची भूमिका उडान बजावते. 

टॅग्स :PuneपुणेTransgenderट्रान्सजेंडरHIV-AIDSएड्स