शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी: तरूणीच्या बेकायदा गर्भपातास नकार देणाऱ्या डॉक्टरवर हल्ला करणारे अटकेत, सांगवी पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 12:43 IST

डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या या हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे-पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या युवतीचा गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून पिंपळे गुरव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरवर टोळक्याने दवाखान्यात घुसून हल्ला केला होता. डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या या हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी सागवी पोलिसांनी या हल्लेखोरांना अटक केली आहे. शनिवारी रात्री  काही अज्ञातांनी डॉक्टरवर कोयत्याने वार केले होते.

पिंपरी, दि. 11-पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या युवतीचा गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून पिंपळे गुरव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरवर टोळक्याने दवाखान्यात घुसून हल्ला केला होता. डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या या हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी सागवी पोलिसांनी या हल्लेखोरांना अटक केली आहे.  शनिवारी रात्री  काही अज्ञातांनी डॉक्टरवर कोयत्याने वार केले होते.

पिंपळे गुरव येथे काटे पुरम चौकात डॉ. अमोल बिडकर यांचे रुग्णालय आहे. एका युवतीला घेऊन एकजण काही दिवसांपूर्वी डॉ. बिडकर यांच्याकडे आला होता. युवती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आलं होतं. 12 आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांचा गर्भ असेल तर कायद्याने गर्भपात करता येणार नाही. गर्भ 20 आठवड्यांचा असल्याने गर्भपात करू शकत नाही, असं डॉक्टरांनी सांगून डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला. हे प्रेमीयुगूल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असल्याची माहिती आहे.

याचा राग आल्याने शनिवारी (9 सप्टेंबर) रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास तिघेजण मोटारीतून बिडकर यांच्या दवाखान्याजवळ आले. एकजण दवाखान्याबाहेर थांबला. दुसरा डॉक्टरांच्या कॅबिनच्या दरवाजावर थांबला.तिसऱ्याने आत जाऊन डॉक्टरांवर कोयत्याने वार केले. डॉक्टरांच्या हातात मोबाईल होता. त्यांनी हात पुढे केला मोबाईलवर वार झेलल्याने मोबाईल फुटला.त्यांच्या बोटांना किरकोळ दुखापत झाली.  खांद्यावर केलेला वार त्यांनी चुकवल्यामुळे ते बचावले. 

या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगवी-पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशनचे सदस्य सांगवी पोलिस ठाण्यासमोर रविवारी सकाळी जमले होते. आरोपींवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली होती.