शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या तरूणीला गर्भपात करण्यास दिला नकार, डॉक्टरवर दवाखान्यात घुसून कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 11:59 IST

पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या युवतीचा गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून पिंपळे गुरव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरवर टोळक्याने दवाखान्यात घुसून हल्ला केला.  

पिंपरी, दि. 10 - पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या युवतीचा गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून पिंपळे गुरव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरवर टोळक्याने दवाखान्यात घुसून हल्ला केला.  शनिवारी रात्री ही घटना घडली असून, हल्लेखोरांनी डॉक्टरवर कोयत्याने वार केले.

पिंपळे गुरव येथे काटे पुरम चौकात डॉ. अमोल बिडकर यांचे रुग्णालय आहे. एका युवतीला घेऊन एकजण काही दिवसांपूर्वी डॉ. बिडकर यांच्याकडे आला होता. युवती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. 12 आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांचा गर्भ असेल तर कायद्याने गर्भपात करता येणार नाही. गर्भ 20 आठवड्यांचा असल्याने गर्भपात करू शकत नाही, असे डॉक्टरांनी सांगून डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला. हे प्रेमीयुगूल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असल्याची माहिती आहे.

याचा राग आल्याने शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास तिघेजण मोटारीतून बिडकर यांच्या दवाखान्याजवळ आले. एकजण दवाखान्याबाहेर थांबला. दुसरा डॉक्टरांच्या कॅबिनच्या दरवाजावर थांबला.तिसऱ्याने आत जाऊन डॉक्टरांवर कोयत्याने वार केले. डॉक्टरांच्या हातात मोबाईल होता. त्यांनी हात पुढे केला मोबाईलवर वार झेलल्याने मोबाईल फुटला.त्यांच्या बोटांना किरकोळ दुखापत झाली.  खांद्यावर केलेला वार त्यांनी चुकवल्यामुळे ते बचावले. 

या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगवी-पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशनचे सदस्य सांगवी पोलिस ठाण्यासमोर आज रविवारी सकाळी जमले. आरोपींवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करन्यात आली आहे