शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

विमान हवेत असताना वैमानिकाला हार्ट ॲटॅक; नागपूर विमानतळावर तातडीचे लॅण्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 10:07 IST

नागपूरमार्गे जाणाऱ्या बांगलादेश एअरलाईन्सचे विमान बीजी-२२ चे मुख्य वैमानिक नौशाद अताउल कयूम यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर सहवैमानिकाने विमानाचे नियंत्रण ताब्यात घेऊन नागपूर एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत (एटीसी) संपर्क साधला आणि नागपूर विमानतळावर विमान तातडीने उतरविण्याची परवानगी मागितली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मस्कत येथून ढाका येथे जाणाऱ्या बांगलादेश एअरलाईन्स विमानाच्या मुख्य वैमानिकाला शुक्रवारी सकाळी ११ वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले.

नागपूरमार्गे जाणाऱ्या बांगलादेश एअरलाईन्सचे विमान बीजी-२२ चे मुख्य वैमानिक नौशाद अताउल कयूम यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर सहवैमानिकाने विमानाचे नियंत्रण ताब्यात घेऊन नागपूर एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत (एटीसी) संपर्क साधला आणि नागपूर विमानतळावर विमान तातडीने उतरविण्याची परवानगी मागितली. नागपूर एटीसीने वेळेचे महत्त्व समजून तात्काळ आकस्मिक लॅण्डिंगची परवानगी दिली आणि सकाळी ११.२३ वाजता विमानाचे यशस्वी लॅण्डिंग करण्यात आले. यादरम्यान पूर्वीपासून धावपट्टीवर उपस्थित असलेले किंग्सवे हॉस्पिटल्सचे डॉ. मोहम्मद एहतेशामुद्दीन यांनी तातडीने ४३ वर्षीय कॅप्टन नौशाद अताउल कयूम यांना बेशुद्ध अवस्थेत विमानातून बाहेर काढले आणि प्राथमिक तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. नौशाद सध्या कोमात आहेत.

विमानात १२६ प्रवासीn बांगलादेश एअरलाईन्सचे १६० सीटर विमान बोईंग-७३८ असून, त्यामध्ये १२६ प्रवासी होते. n सहवैमानिकाने विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविले. विमानातील सर्व प्रवाशांना उतरवून टर्मिनलमध्ये आणण्यात आले. n प्रवाशांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेडने केली. प्रवाशांना रात्रीपर्यंत ढाका येथे नेण्यासाठी व्यवस्था करण्यात येत होती.

टॅग्स :nagpurनागपूरAirportविमानतळ