शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

चित्र-शिल्पकलेला राजाश्रय देऊ

By admin | Updated: August 8, 2015 02:09 IST

जिथे साहित्य-कलांचा आदर केला जातो, तीच संस्कृती विकसित मानली जाते. विविध कलागुणांचा संपन्न वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात यापुढे चित्र-शिल्पकलेलाही राजाश्रय मिळवून देऊ

मुंबई : जिथे साहित्य-कलांचा आदर केला जातो, तीच संस्कृती विकसित मानली जाते. विविध कलागुणांचा संपन्न वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात यापुढे चित्र-शिल्पकलेलाही राजाश्रय मिळवून देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. श्लोक आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या ‘दि नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्र-शिल्पकला प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. ‘प्रादेशिकतेचा पुनर्विचार’ (रिथिंकिंग दी रिजनल) या संकल्पनेवर आधारीत ‘एनजीएमए’ येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २0व्या शतकाच्या आरंभापासूनची राज्याच्या कानाकोपऱ्यातील कलावंतांनी रेखाटलेली रंगचित्रे आणि कलावस्तूंचा समावेश असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. कलासक्त असलेले मुख्यमंत्री प्रदर्शनातील कलाकृती पाहून अक्षरश: भारावून गेले.यावेळी ‘एनजीएमए’च्या अध्यक्षा डॉ. फिरोझा जे. गोदरेज, खासदार व ‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन विजय दर्डा, ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सच्या माजी अधिष्ठाता व विद्यमान प्राध्यापक डॉ. मनीषा पाटील, एनजीएमए डायरेक्टर शिवप्रसाद खेन्नेड आणि श्लोकच्या संस्थापिका व ‘रिथिंकिंग दि रिजनल’च्या प्रकल्प संचालक शीतल दर्डा उपस्थित होते. प्रारंभी आपल्या भाषणात खासदार दर्डा यांनी कलाक्षेत्राकडे विशेषत: चित्र-शिल्पकलेबाबत शासन उदासीन असल्याचे सांगत या कलेसाठी विशेष पारितोषिक सुरू करण्याची मागणी केली. तर राज्यातील कलावंतांना वाव मिळण्यासाठी कला दालनांची आवश्यकता असून जे.जे. स्कूल आॅफ आटर््समधील पदे तसेच सांस्कृतिक खात्यातील आर्ट डायरेक्टरचे पद गेल्या आठ वर्षापासून रिक्त आहे, याकडे राजेंद्र दर्डा यांनी लक्ष वेधले. हाच धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र कायमच कलेच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. आपल्या अजिंठा लेण्यांपासून प्रेरणा घेत पार चीनमध्ये शिल्पकला विकसित झाली. हा आमचा समृध्द वारसा आहे. मात्र, गेल्या काही काळात चित्र-शिल्पकला दुर्लक्षित राहिली. त्यामुळे या कलेसही राजमान्यता मिळवून देऊ. त्यासाठी कलाप्रेमी ‘दर्डा’ परिवाराच्या सूचनांचा नक्की विचार करु, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. लोकमत समूहाच्या माध्यमातून कायमच कलाकारांना प्रोत्साहन मिळाले. नवीन कलाकारांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्याचे काम झाले. श्लोकच्या संस्थापिका शीतल दर्डा हीच परंपरा पुढे चालवित आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. कार्यक्रमानंतर या उद्घाटनासंदर्भातील टिष्ट्वटही मुख्यमंत्र्यांनी केले.श्लोकच्या माध्यमातून उदयोन्मुख कलाकारांची कला जगापुढे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. गतकाळातील महाराष्ट्रीयन कलांच्या मनोवेधक चित्रणातून राज्यातील विविधताच प्रतिबिंबित होते. यासाठीच ‘रिथिंकिग द रिजनल’ म्हणजेच प्रादेशिकतेचा पुनर्विचार हे प्रदर्शन श्लोकच्या प्रवासातील आणखी एक खंबीर पाऊल आहे, अशी भावना श्लोकच्या संस्थापिका शीतल दर्डा यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. लोकमतचे व्हाईस पे्रसिडेन्ट बिजॉय श्रीधर यांनी सूत्रसंचालन केले. कला प्रदर्शन पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्ती तसेच जे. जे. स्कुल आॅफ आर्टसमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)