शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Petrol, Diesel Shortage: राज्यात पेट्रोल, डिझेलची टंचाई होणार? कंपन्यांकडून पुरवठा थंडावला; या महत्वाच्या जिल्ह्यात संकटाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 10:18 IST

Petrol, Diesel Shortage: पेट्रोलिअम कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागले आहे. याचाच परिणाम म्हणून पेट्रोल पंपांना मागणीनुसार पुरवठा कमी होऊ लागला आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. परंतू गेल्या महिनाभरापासून इंधनाच्या वाढत्या किंमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे पेट्रोलिअम कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागले आहे. याचाच परिणाम म्हणून पेट्रोल पंपांना मागणीनुसार पुरवठा कमी होऊ लागला आहे. येत्या काही दिवसांत हे प्रमाण वाढण्याची शक्यता असून राज्यभरात मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे. पेट्रोल पंप असोसिएशनने याची माहिती दिली आहे. जेवढी मागणी आहे त्यापेक्षा कमी प्रमाणावर पुरवठा होऊ लागला आहे. पेट्रोल पंपावर तीन दिवसाचा स्टॉक असावा लागतो, परंतू कमी पुरवठा होत असल्याने पेट्रोल पंप ड्राय पडू लागले आहेत. यामुळे काही ठिकाणी वाद होत असल्याचे औरंगाबाद जिल्ह्याचे पेट्रोल असोसिएशन अध्यक्ष अकील अब्बास यांनी सांगितले. 

याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.  पेट्रोल डिझेलचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद पडत आहेत.  लोकांमध्ये वाद होऊ नयेत म्हणून जनजागृती करण्याची गरज त्यांनी जिल्हा व्यवस्थापनाकडे व्यक्त केली. 

राज्यभरात टंचाई होईल का? कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने आणि दररोज वाढविले जाणारे पेट्रोल, डिझेलचे दर वाढत नसल्याने पेट्रोलिअम कंपन्यांची मोठी पंचाईत झाली आहे. लीटरमागे कंपन्यांना १५ ते २५ रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळे या कंपन्यांनी उत्पादन थांबविले किंवा कमी केले आहे. याचा परिणाम पेट्रोल, डिझेलच्या पुरवठ्यावर होऊ लागला आहे. राज्यभरात सध्या पेट्रोल पंपांना मागणीपेक्षा कमी प्रमाणावर इंधन पुरवठा केला जात आहे. ही परिस्थिती सुधरली नाही तर येत्या १५-२० दिवसांत पेट्रोल, डिझेलची टंचाई जाणवू लागणार असल्याचे एका पेट्रोलपंप मालकाने सांगितले. 

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप