शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राणेंविरोधातील याचिकाकर्ते केतन तिरोडकरांनी मागणी केल्यास त्यांना पोलीस संरक्षण देऊ- दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 21:54 IST

याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी मागणी केल्यास त्याना पोलीस संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौ-यावर असलेल्या मंत्री केसरकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला.

सावंतवाडी : स्वच्छ मंत्रिमंडळात कलंकित व्यक्तीला घ्यायचे की नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओळखावे. मात्र मला मिळालेल्या ईश्वरी संकेताप्रमाणे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयात आठवड्यात तीन वेळा सुनावणी झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एवढे होणे म्हणजे केवढा हा ईश्वरी संकेत आहे, असा खुलासा राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. तसेच याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी मागणी केल्यास त्याना पोलीस संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौ-यावर असलेल्या मंत्री केसरकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला.मंत्री केसरकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यांची तीन वेळा सुनावणी झाली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्ट व्यक्तीची यादी सरकारकडे मागितली आहे. त्यामुळे अशा कलंकित व्यक्तींना मंत्री मंडळात घ्यायचे की नाही ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावे, असे सांगत मुख्यमंत्र्यांवर वरून दबाव असू शकतो, असा खुलासा त्यामुळे त्यांना हे करावे लागत आहे. अन्यथा लोकनेता असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाले तर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आले आहे. मग राणे यांची चौकशी सुरू झाली तर त्यांनाही घ्यायचे की नाही घ्यायचे ते भाजपाने ठरवावे असे सांगितले. राणेंमुळे शिवसेना कधीही सरकारमधून बाहेर पडणार नसल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले. तसेच जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुख यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. त्यात पुढील दोन वर्षांत निवडणूक असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती, असे सांगितले. त्यामुळे सरकारमधून बाहेर पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे जाहीर केले.माझ्यावर टीका करणा-या सतीश सावंत यांना ईश्वरी संकेताचे महत्त्व काय कळणार, जे लोक पुण्यवान असतात, त्यांनाच ईश्वरी संकेत मिळत असतात. सावंत हे नेहमी या ना त्या कारणाने अडचणीत येतात. त्यामुळे त्यांना माझ्या विरोधात काही तरी बोलावे लागते आणि त्यांना बोलण्याशिवाय पर्यायच नाही अन्यथा त्यांचे नेते विचारतील, अशी टीकाही मंत्री केसरकर यांनी केली.ईडीच्या चौकशीत एका नेत्याचे काय झाले ते बघाईडीच्या चौकशीत राज्यातील एका नेत्याचे काय झाले त्याचा अभ्यास करावा. त्यामुळे मनी लाँड्रिंग हा मोठा गुन्हा आहे. त्यात काही होऊ शकते, सर्वोच्च न्यायालयानेही अशा राजकीय व्यक्तीची यादी मागवली असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे