शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची याचिका

By admin | Updated: December 26, 2016 04:50 IST

आदर्श सोसायटी इमारत घोटाळ््याच्या खटल्यात आरोपी करण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सीबीआयला दिलेली

मुंबई : आदर्श सोसायटी इमारत घोटाळ््याच्या खटल्यात आरोपी करण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सीबीआयला दिलेली संमती बेकायदा ठरवून, रद्द करून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री व काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे.या प्रकरणात चव्हाण यांना आरोपी करून त्यांच्यावर भादंवि कलम १२० (फौजदारी कट) आणि कलम ४२० (फसवणूक) याखेरीज भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यान्वये गुन्ह्यांसाठी खटला चालविण्यास राज्यपाल राव यांनी गेल्या फेब्रुवारीत संमती दिली होती. तत्कालीन महसूलमंत्री या नात्याने चव्हाण यांच्यावर हा खटला भरण्यात आला आहे. चव्हाण यांनी या इमारतीत आपल्या दोन नातेवाईकांना फ्लॅट देण्याच्या बदल्यात आदर्श सोसायटीला वाढीव ‘एफएसआय’ मंजूर केला व नियमांचे उल्लंघन करून इमारतीमधील ४० टक्के फ्लॅट लष्करी कर्मचाऱ्यांखेरीज इतरांना देण्यास परवानगी दिली, असा ‘सीबीआय’चा आरोप आहे.सीबीआयने नोंदविलेल्या ‘एफआयआर’मध्ये चव्हाण यांचा आरोपी म्हणून उल्लेख होता. मात्र, तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी, डिसेंबर २०१३ मध्ये खटल्यासाठी परवानगी नाकारल्याने सीबीआयने चव्हाण यांच्याविरुद्धची केस बंद केली होती. राज्यपालांनी संमती नाकारली असल्याने, आरोपींमधून आपले नाव वगळावे, यासाठी चव्हाण यांनी या पूर्वी केलेली याचिका उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी मार्चमध्ये फेटाळली होती.राज्यात सत्तांतर होऊन भाजपाचे सरकार आल्यावर विद्यासागर राव राज्यपाल झाले व त्यांनी खटल्यासाठी परवानगी दिली. राज्यपाल राव यांनी हा निर्णय तथ्यांचा सारासार विचार न करता आणि कुहेतूने घेतलेला आहे, तसेच तो अन्याय्य व मनमानी असल्याने रद्द करावा, अशी चव्हाण यांनी याचिकेत विनंती केली आहे.आदर्श घोटाळा उघड झाला, तेव्हा अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते व त्यात नाव गोवले गेल्यावर, नोव्हेंबर २०१० मध्ये त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. (विशेष प्रतिनिधी)