शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंविरोधातील याचिका राजकीय हेतूने प्रेरित, HCचे निरीक्षण, उद्धव ठाकरेंविरोधातील याचिकाही फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 11:33 IST

मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे या दोन्ही जनहित याचिकांवर सुनावणी झाली.

मुंबई : मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतलेल्या एकनाथ शिंदे व त्यांच्यासह बंडखोर आमदारांविरोधात सात नागरिकांनी केलेली याचिका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना याचिकेवर सुनावणी घेण्यापूर्वी एक लाख रुपये अनामत रक्कम म्हणून भरण्याचे निर्देश दिले, तर दुसरीकडे नागरिकांना उपद्रव दिल्याबद्दल उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करणारी जनहित याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळली. मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे या दोन्ही जनहित याचिकांवर सुनावणी झाली. शिंदे व बंडखोर नेत्यांविरोधात सात जणांनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर असलेल्या बंडखोर नेत्यांमुळे राज्यात राजकीय गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आपले कर्तव्य सोडून ते अन्य राज्यात गेले. या मंत्र्यांच्या अनुपस्थित महाविकास आघाडी राज्यकारभार कसा चालविणार, याची योजना सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. बुधवारी रात्री झालेल्या घडमोडीनंतरही (उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा) या याचिकेवर सुनावणी घ्यायची का? असा सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे वकील असीम सरोदे यांना केला. बंडखोर आमदारांनी त्यांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केलेल्या कृत्याची न्यायालयाने दखल घ्यावी, असे सरोदे यांनी म्हटले. 

-    न्यायालयाने याची का दखल घ्यावी? तुम्ही निवडून दिलेले मंत्रिमंडळ आहे. त्यामुळे तुम्ही कारवाई करा. आम्ही का कारवाई करू? मंत्री किंवा नेत्यांनी सतत राज्यात किंवा शहरातच असावे, असा कुठे नियम आहे का? असे सवाल न्यायालयाने सरोदे यांना केले.-    ही याचिका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे आम्हाला सकृतदर्शनी वाटते. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी सुनावणीपूर्वी दोन आठवड्यांत एक लाख रुपये अनामत रक्कम भरावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. अनामत रक्कम भरली, तरच याचिका सुनावणीसाठी पटलावर लावावी, अन्यथा ती आपोआप निकाली काढली जाईल, असे न्यायालयाने म्हटले.-    दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी गेल्याच आठवड्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी सार्वजनिक उपद्रव दिल्याबद्दल त्यांची चौकशी करून गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी याचिकेद्वारे केली होती. तसेच त्यांना बंडखोर नेत्यांवरून पत्रकार परिषदा, राज्यात दौरे करण्यास मनाई करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. न्यायालयाने गुरुवारी ही याचिका फेटाळली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेHigh Courtउच्च न्यायालय