शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोमामध्ये असलेल्या रुग्णाचे बँक खाते पत्नी चालवू शकते: उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 04:51 IST

पती कोमात असल्याने, पत्नीला आधीच खूप मानसिक त्रास झाला आहे. आम्हाला त्यांना आणखी त्रास द्यायचा नााही, असे म्हणत, उच्च न्यायालयाने शुक्रवारी नवी मुंबईतील एका महिलेला तिच्या ६३ वर्षीय पतीचे बँक खाते चालविण्याची परवानगी दिली.

मुंबई : पती कोमात असल्याने, पत्नीला आधीच खूप मानसिक त्रास झाला आहे. आम्हाला त्यांना आणखी त्रास द्यायचा नााही, असे म्हणत, उच्च न्यायालयाने शुक्रवारी नवी मुंबईतील एका महिलेला तिच्या ६३ वर्षीय पतीचे बँक खाते चालविण्याची परवानगी दिली.पतीवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने, नवी मुंबईतील एका महिलेने कोमात असलेल्या पतीची ‘पालक’ म्हणून आपली नियुक्ती करून, त्याचे बँक खाते चालविण्याची परवानगी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कोमात असलेल्या रुग्णांच्या अधिकारांबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नसल्याचे तिने याचिकेत म्हटले आहे. न्या. एस. एम. केमकर व न्या. जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.यापूर्वीच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील उपविभागीय दंडाधिकाºयांना महिलेच्या पतीच्या तब्येतीसंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले, तसेच महिलेच्या दोन्ही मुलींना ‘ना-हकरत’ प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले.शुक्रवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने दंडाधिकाºयांचा अहवाल आणि मुलींनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र वाचून महिलेला पतीचे बँक खाते चालविण्याची परवानगी दिली आहे. ‘याचिकाकर्ती खूप त्रासात आहे. त्यामुळे आम्ही तिला पतीचे बँक खाते आॅपरेट करण्यास परवानगी देत आहोत,’ असे खंडपीठाने म्हटले.महिन्याला किमान लाखभर रूपये खर्चमहिलेचा पती एका सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनीत महाव्यवस्थापक म्हणून कामाला होता. निवृत्त झाल्यानंतर त्याला पॅरालीसिसचा अटॅक आला. उपचार करण्यासाठी त्यांना नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. आॅगस्टपासून ते व्हेंटिलेटरवरच आहेत. महिलेचे पती कोमात असले, तरी त्यांच्या तब्येत ठीक असल्याने, त्यांना २८ दिवसांत घरी सोडण्यात आले. मात्र, घरी त्यांची काळजी पॅरामेडिकच्या देखरेखीखालीच घ्यायची असल्याची सूचना डॉक्टरांनी केली आहे. त्यांना घरीही व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले आहे. यासाठी महिन्याला किमान एक लाख रुपये खर्च येत आहे. हा खर्च भागविण्यासाठी उच्च न्यायालयाने याचिकाकर्तीला कोमात असलेल्या पतीचे बँक खाते चालविण्याची परवानगी दिली.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टbankबँक