अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्याकांड प्रकरणातील तिघा आरोपींच्या नार्कोसह इतर मानसशास्त्रीय चाचण्यांसाठी जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली.आरोपींच्या मानसशास्त्रीय चाचण्यांसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शशीराज पाटोळे यांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता़ मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, नितीन भैलुमे व संतोष भवाळ यांची मुंबईतील सीबीआय लॅबमध्ये ५ व ६ आॅगस्टला ‘नार्को’, ‘ब्रेन मॅपिंग’, ‘लायडिटेक्टर’, ‘पोलिग्राफ’ या चाचण्या घेण्यात येणार आहेत़ आरोपी कर्जत कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत़ (प्रतिनिधी)>नांदगाव शिगवेत अत्याचार; मुख्य आरोपी गजाआडनांदगाव शिंगवे येथे शनिवारी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेला आरोपी मल्हारी सखाराम उमप यास सोमवारी दुपारी पोलिसांनी औरंगाबाद रोडवरील पांढरीपूल परिसरात सापळा रचून पकडले़ घटनेनंतर पोलिसांनी उमपचा साथीदार वसंत विलास वाघमारेला ताब्यात घेतले होते़ उमप मात्र, फरार होता़ आरोपीला मंगळवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे़
आरोपींच्या नार्को चाचणीला परवानगी
By admin | Updated: August 2, 2016 05:15 IST