आप्पासाहेब पाटीलसोलापूर दि १५ : ३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीन अभय योजना जाहीर केली असून यात ग्राहकाला थकबाकीची रक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलत राहणार आहे. तसेच थकीत रकमेवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. महावितरणच्या ज्या घरगुती व कृषी ग्राहकांचा वीजपुरवठा ३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला आहे. अशा ग्राहकांसाठी ही नवीन योजना असून योजनेत सहभागी होणाºया ग्राहकांच्या मूळ थकीत रकमेची पाच हप्त्यात विभागणी करण्यात येणार आहे. त्यापैकी मूळ थकीत रकमेचा पहिला हप्ता व वीज जोडणीसाठी आवश्यक असणारी रक्कम भरल्यानंतर ग्राहकाचा वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. उर्वरित मूळ थकबाकीच्या ४ हप्त्यांचा भरणा ग्राहकाने त्याला येणाºया मासिक वीज बिलासोबत करणे आवश्यक आहे. ग्राहकांनी थकीत रकमेचा पूर्ण भरणा निर्धारित पाच हप्त्यात पूर्ण केला तरच संबंधित ग्राहकाला थकीत रकमेवर व्याज व विलंब आकारात १०० टक्के माफी मिळणार आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या कृषी व घरगुती ग्राहकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना
By appasaheb.dilip.patil | Updated: September 15, 2017 15:29 IST
आप्पासाहेब पाटीलसोलापूर दि १५ : ३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीन अभय योजना जाहीर केली असून यात ग्राहकाला थकबाकीची रक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलत राहणार आहे. तसेच थकीत रकमेवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. ...
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना
ठळक मुद्देथकबाकीची रक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलतथकीत रकमेवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना मिळणार फायदा