शहरं
Join us  
Trending Stories
1
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
3
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
4
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
5
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
6
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
7
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
8
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
9
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
10
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
11
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
12
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
13
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
14
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
15
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
16
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
17
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
18
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
19
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
20
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...

सत्तेचा सारीपाट : काय बघून लोक मतदान करत असतील?

By मनोज मुळ्ये | Updated: May 4, 2024 14:03 IST

मनोज मुळ्ये  केवळ राजकीय विश्लेषकच नाही तर वर्षानुवर्षे राजकारणात राहिलेल्या लोकांनाही हाच प्रश्न पडत असेल की काय बघून लोक ...

मनोज मुळ्ये केवळ राजकीय विश्लेषकच नाही तर वर्षानुवर्षे राजकारणात राहिलेल्या लोकांनाही हाच प्रश्न पडत असेल की काय बघून लोक मतदान करतात. किती उद्योग आले ? किती लोकांना रोजगार मिळाला ? पाण्याची समस्या सुटली का ? प्रशासकीय कामे वेळेत होतात की नाही ? पर्यटन विकासासाठी काय केले ? शेती, बागायतीसाठी काय केले ? आरोग्याच्या सुविधा वाढल्या का ? सांस्कृतिक चळवळ वाढण्यासाठी काय केले ? उमेदवाराचे शिक्षण किती आहे ? त्याला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे का ? अशा प्रश्नांची मोजपट्टी लावून लोक उमेदवाराला मतदान करत असतील का ? या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे नाही, असेच येईल. जर काम बघून उमेदवार निवडला जात असेल तर वर्षानुवर्षे काम करणारा राजकीय नेता पडतो आणि राजकारण, समाजकारणात नवखा असलेला अभिनेता निवडून येतो, अशी उदाहरणे दिसली नसती. शिक्षण आणि राजकारणाची सांगड लोक कधीच घालत नाहीत. ज्याला तळमळीने काम करायचे आहे, त्याला शिक्षण आडवे येत नाही, याची असंख्य उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. उद्योग, रोजगार, पर्यटन यासारख्या सार्वजनिक विषयांवरुन लोक वैयक्तिक मत बनवत नाहीत. मग लोक नक्की काय बघून मतदान करत असावेत ?राजकीय लोकांच्यादृष्टीने कदाचित याचे पाचदहा निकष असतील; पण एक महत्त्वाची गोष्ट आहे ती तळागाळातील सक्षम कार्यकर्ता. सामान्य माणसांचा राजकीय नेत्यांशी थेट संपर्क खूप कमी वेळा येतो. त्यांचा अधिक संपर्क असतो तो त्यांच्या गावातल्या कार्यकर्त्याशी. त्यांच्या वाडीतील सार्वजनिक समस्या असोत किंवा त्याला वैयक्तिक स्तरावर लागणारी रुग्णालय, सरकारी कार्यालयाबाबतची मदत असो, त्याच्या उपयोगी पडतो तो त्याच्या गावातला कार्यकर्ता.सरकारी कार्यालयात कामात दिरंगाई होत असेल तर ते लवकर मार्गी लावण्यासाठी त्यांच्यासोबत कार्यकर्ताच पुढे असतो. नेत्याकडे जाऊन आपल्या गावासाठी पाणी योजना आणणारा कार्यकर्ताच असतो. तोच त्या गावासाठी नेता असतो. त्याच्यावरच लोकांचा विश्वास असतो. त्यामुळे ज्या पक्षाकडे असे कार्यकर्ते आहेत, त्याच पक्षाला लोक निवडून देतात. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये ज्यांना मोठे यश मिळते, तोच त्या भागातील प्रमुख पक्ष.

ही ताकद अनेक वर्षे शिवसेनेकडे (एकत्रित शिवसेनेकडे) आहे. काँग्रेसकडे, भाजपकडे असे तळागाळातले मान मोडून लोकांसाठी काम करणारे कार्यकर्ते कमी आहेत. शिवसेना खालोखाल ही ताकद राष्ट्रवादीकडे आहे; पण या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आहे. कार्यकर्ते इकडून तिकडे गेले आहेत. कोणाचा पाया किती मजबूत आहे, हे आताच्या निवडणुकीतूनच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गVotingमतदान