शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

Coronavirus: ‘या’ चार राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक; ठाकरे सरकारचा निर्णय

By प्रविण मरगळे | Updated: November 23, 2020 19:21 IST

Coronavirus: पुढील ८ दिवस दिल्ली आणि गुजरातमधून येणाऱ्या ट्रेन आणि विमान सेवेवर सरकारची नजर असणार आहे.

ठळक मुद्देसध्यातरी केंद्र सरकारसोबत उच्चस्तरीय बैठक होणार आहे, यात गुजरातसह ३ राज्यांचा समावेश आहे.जर कोणी प्रवाशी विमानाने मुंबईत येत असेल तर ७२ तासापूर्वी त्या व्यक्तीचा आरटी पीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह येणे बंधनकारकरस्ते महामार्गाने मुंबई आणि राज्यात येणाऱ्या लोकांना ९६ तास आधी कोरोनाची चाचणी करणं बंधनकारक

मुंबई – देशात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, यातच दिल्लीत कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने खबरदारी घेतली आहे. परराज्यातून मुंबईत येणाऱ्या लोकांसाठी सरकारनं कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. यात दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थान या राज्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या राज्यातून रस्ते महामार्गाने मुंबई आणि राज्यात येणाऱ्या लोकांना ९६ तास आधी कोरोनाची चाचणी करणं बंधनकारक आहे. या चाचणीत आरटी-पीसीआर नेगिटिव्ह रिपोर्ट आल्यास राज्यात प्रवेश मिळणार आहे. त्याचसोबत इतर राज्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. विमानाने प्रवास करणाऱ्यांनाही चाचणीशिवाय विमानात प्रवेश मिळणार नाही. राज्य सरकारने विमानाने येणाऱ्या लोकांसाठी कडक निर्बंध आखले आहेत.

जर कोणी प्रवाशी विमानाने मुंबईत येत असेल तर ७२ तासापूर्वी त्या व्यक्तीचा आरटी पीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह येणे बंधनकारक आहे. कोरोना चाचणीच्या रिपोर्टशिवाय येण्या-जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.तर दुसरीकडे रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांकडे चाचणी रिपोर्ट नसेल तर त्यांची थर्मक स्क्रिनिंग आणि तापमानाची तपासणी करण्यात येणार आहे.

सरकारच्या आदेशानुसार जर कोणाकडे प्रवासापूर्वी चाचणी अहवाल नसेल तर त्यांना स्वखर्चाने कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. चाचणीनंतर जर कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर  त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात येतील. अलीकडेच महाराष्ट्राचे मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता सरकार कडक पाऊलं उचलू शकते असे संकेत दिले आहेत.

 

दिल्ली आणि गुजरातमधून येणाऱ्यांवर नजर

सोमवारी विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुढील ८ दिवस दिल्ली आणि गुजरातमधून येणाऱ्या ट्रेन आणि विमान सेवेवर सरकारची नजर असणार आहे. यानंतर दोन्ही ठिकाणाहून दळणवळण व्यवस्था सुरु ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. ३० नोव्हेंबरपूर्वी यावर निर्णय घेण्यात येईल. सध्या राज्यात लॉकडाऊनची नियमावली लागू आहे. जर गुजरातने लॉकडाऊन जाहीर केले तर तेथील नागरिक राज्यात येऊ शकतात, ना गुजरातमध्ये जाऊ शकतात. सध्यातरी केंद्र सरकारसोबत उच्चस्तरीय बैठक होणार आहे, यात गुजरातसह ३ राज्यांचा समावेश आहे.

सुप्रीम कोर्टाने माहिती मागवली

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात ४ राज्यांकडून स्टेटस रिपोर्ट मागवला आहे. ज्यात दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात यांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, डिसेंबर महिना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा आव्हानात्मक असणार आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयारी करून ठेवली आहे. दिल्लीत रविवारी ६ हजार ७४६ रुग्ण आढळून आले आहेत, तर महाराष्ट्रात ५ हजार ७५३ रुग्ण सापडले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्लीgoaगोवाRajasthanराजस्थानGujaratगुजरात