शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
3
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
5
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
6
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
7
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
9
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
10
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
11
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
12
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
13
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
14
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
15
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
16
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
17
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
18
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
19
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

'सोलापूरकर सारख्या लोकांना गोळ्या घालून मारलं पाहिजे'; खासदार उदयनराजे भोसले संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:08 IST

खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर ( Rahul Solapurkar ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत मोठं विधान केलं आहे. या विधानावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटण्यासाठी 'पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले', असा दावा सोलापूरकर यांनी केला. यावर आता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) यांनी प्रतिक्रिया दिली असून संताप व्यक्त केला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले,  सर्वधर्म समभाव भावनेतून ज्यांनी सर्व समाजाला एक केले. एकता हा त्यामागचा एक मंत्र होता, राज्यकाराभारात लोकांचा सहभाग व्हावा. ज्या लोकशाहीमध्ये आपण वावरतो त्या लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला. त्यांनी स्वत:चं कुटुंब कधी पाहिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच तडजोड केली नाही, त्यांच्याबद्दल गलिच्छ विधान केली जातात. दोन, तीन दिवसापूर्वी असंच एक विधान केले. या विधानामुळे अनेक शिवभक्तांना वेदना झाल्या. हा राहुल सोलापूरकर ( Rahul Solapurkar )  कोण आहे? अशी लोक काही लाच घेतात, त्यांनी लाचे पलिकडे काही समजत नाही. हे लोक बोलत असताना काहीही बोलतात. अशा लोकांच्या जिभा हासडल्या पाहिजेत. अशा लोकांना जनतेने दिसेल तिथे ठेचले पाहिजे, असा सांगत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) यांनी संताप व्यक्त केला. 

अशा लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होतो

"अशा विकृत लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी या संदर्भात बोलणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांचीही भेट घेऊन अशी विधान करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी करणार आहे.  छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. विकृत विधान करतात त्यांच्यामुळे समाजात तेढ निर्माण होतात. अशा लोकांना त्याच ठिकाणी ठेचलं पाहिजे, चित्रपट इंडस्ट्रीतील लोकांनी अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे, असंही खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले. 

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले,"अशी विधान करणाऱ्या लोकांना गाडलं पाहिजे, यांना जर गाडलं नाही तर या देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे. मी त्यांचा निषेध करतो. मला असं वाटतं याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. यालाच नाही तर अशी विधान करणाऱ्यांना गोळ्या घालून मारलं पाहिजे असं वाटतं, असंही उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) म्हणाले. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपा