शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
2
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
3
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
4
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
5
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
6
नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...
7
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
8
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
9
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
10
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
11
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
12
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
13
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
14
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
15
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
16
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
17
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
18
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
19
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
20
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला

महाराष्ट्रातील जनतेला उष्णतेचा सर्वाधिक धोका; ७५% जिल्हे ‘हाय रिस्क’मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:03 IST

उष्णतेच्या लाटांमुळे २०३० पर्यंत भारतातील ३.५ कोटी पूर्णवेळ नोकऱ्या जाण्याची भीती असून, जीडीपीमध्ये ४.५ टक्के घट होण्याची भीतीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई : भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ७६ टक्के लोक जिथे राहतात, अशा सुमारे ५७ टक्के जिल्ह्यांतील जनता ‘उच्च’ ते ‘खूप उच्च’ उष्णतेचा धोका सहन करत आहे. भारताच्या ३/४ लोकसंख्येला गंभीर उष्णतेचा धोका असून, महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि केरळातील तब्बल ७५ टक्क्यांपेक्षा अधिक जिल्हे उष्णतेच्या धोक्याच्या पातळीवर असल्याची धक्कादायक बाब ‘सीईईडब्ल्यू’ने केलेल्या अभ्यासात समोर आली आहे. 

उष्णतेच्या लाटांमुळे २०३० पर्यंत भारतातील ३.५ कोटी पूर्णवेळ नोकऱ्या जाण्याची भीती असून, जीडीपीमध्ये ४.५ टक्के घट होण्याची भीतीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई, दिल्लीत सर्वाधिक धोकादायक वातावरणमुंबई, दिल्लीसारखी शहरे सर्वाधिक धोकादायक वातावरणाचा सामना करत आहेत. लोकसंख्येची घनता, दाट इमारती आणि सामाजिक-आर्थिक आणि आरोग्य समस्या उष्णतेचे धोके वाढवतात. उच्च तापमान आणि आरोग्य बिघडण्याच्या तक्रारी आंध्र प्रदेश, महाराष्ट्रात सर्वाधिक होत आहेत. ४१७  अति उच्च जोखीम श्रेणींमध्ये येत आहेत.

सर्वाधिक उष्णतेचा धोका येथे...दिल्ली, महाराष्ट्र, गोवा, केरळ, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही राज्ये सर्वाधिक उष्णतेचा धोका सहन करत आहेत. महाराष्ट्रातील विदर्भात उष्णतेबाबत अत्यंत संवेदनशील स्थिती आहे.

२०२४ हे भारतात आणि जागतिक स्तरावर आतापर्यंतचे सर्वात गरम वर्ष ठरले. २७-२८ फेब्रुवारी रोजी देशात पहिली उष्णतेची लाट आली.१,६६,००० हून अधिक लोकांचा मृत्यू १९९८ ते २०१७ दरम्यान उष्णतेच्या लाटांमुळे झाला आहे.४८,००० हून अधिक उष्माघाताचे रुग्ण १५९ जणांचा उष्माघातामुळे २०२४ मध्ये मृत्यू झाला.

रात्रीची थंडी गायब, उष्ण रात्री वेगाने वाढल्याचिंताजनक बाब म्हणजे, खूप उष्ण रात्रींची संख्या आणखी वाढत आहे, ज्यामुळे आरोग्य धोके निर्माण होत असून, गेल्या दशकात अतिशय उष्ण दिवसांपेक्षा रात्रींची संख्या वेगाने वाढत आहे.

अत्यंत उष्ण रात्रींमध्ये वाढ ही सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या (१० लाखांहून अधिक) जिल्ह्यांमध्ये दिसून येते. गेल्या दशकात, मुंबईत प्रत्येक उन्हाळ्यात १५ अतिरिक्त अति उष्ण रात्री, बंगळुरू (११), भोपाळ आणि जयपूर (प्रत्येकी ७), दिल्ली (६) आणि चेन्नई (४) अशी वाढ झाली आहे. 

रात्रीचे उच्च तापमान धोकादायक मानले जाते कारण शरीराला थंड होण्याची संधी मिळत नाही. थंड असलेल्या हिमालयीन भागामध्येही खूप उष्ण दिवस आणि खूप उष्ण रात्री वाढल्या आहेत. याचा परिणाम नाजूक पर्वतीय परिसंस्थांवर गंभीरपणे होऊ शकतो.  गर्भवती महिला, वृद्ध, लहान मुले, बाहेर काम करणारे मजूर, आणि दीर्घकालीन आजार असणारे रुग्ण यांना उषण्तेचा सर्वाधिक धोका आहे.

सर्वाधिक फटका कुणाला? : तीव्र आणि वारंवार येणाऱ्या उष्णतेच्या लाटा देशातील कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना संकटात टाकत आहेत. त्यांना बहुतेकदा पाणी आणि थंड पाण्याची कमतरता असते आणि कडक उन्हात काम करणाऱ्या कामगारांच्या सहनशक्तीची यावेळी परीक्षा असते.