शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

‘मार्च एंड’मुळे रखडली ७ लाख जणांची पेन्शन, ५ तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता

By संकेत शुक्ला | Updated: April 3, 2024 07:52 IST

Pension: राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात यंदा दोन तारीख उलटूनही सेवानिवृत्ती वेतन जमा न झाल्याने जिल्हा कोषागार कार्यालयात त्यांचे दूरध्वनी खणखणू लागले आहेत. मात्र, मार्च एंडच्या धावपळीमुळे हा निधी जमा होण्यास विलंब झाल्याने गुरुवारपर्यंत (दि. ४) पेन्शन खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

- संकेत शुक्लनाशिक - राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात यंदा दोन तारीख उलटूनही सेवानिवृत्ती वेतन जमा न झाल्याने जिल्हा कोषागार कार्यालयात त्यांचे दूरध्वनी खणखणू लागले आहेत. मात्र, मार्च एंडच्या धावपळीमुळे हा निधी जमा होण्यास विलंब झाल्याने गुरुवारपर्यंत (दि. ४) पेन्शन खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची पेन्शन रक्कम सध्या रखडली आहे.

राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या संस्थांमध्ये तसेच निम्न सरकारी कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती वेतनाला तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला आहे. मार्च एंड आणि ई-कुबेर यंत्रणा अद्ययावतीकरण यामुळे वेळेत निधी न मिळाल्याने ही रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यावर जमा होऊ शकली नाही. त्यामुळे राज्यातील प्रत्येक कोषागार कार्यालयात त्याबाबत चौकशी करण्यात येत असून, पेन्शन जमा होण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांत सरासरी ६ तारखेचा अवधी लागू शकेल, असे सांगितले जात आहे. राज्यातील २७ कोषागार कार्यालयांमध्ये सुमारे ६ लाख ७५ हजार निवृत्त कर्मचारी आहेत.

सेवानिवृत्त कामगारांचे जीवन निवृत्ती वेतनावर अवलंबून असते. त्यावरच त्यांची उपजीविका असल्याने हे वेतन जमा न झाल्याने अनेक ज्येष्ठांनी कोषागार कार्यालयात धाव घेतली होती. यातील तांत्रिक अडचण दूर झाली असून, मंगळवारी हा निधी कोषागार कार्यालयांना वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पेन्शन खात्यावर वितरित होईल, अशी माहिती अप्पर कोषागार अधिकारी रमेश शिसव यांनी दिली.

काय घ्यावी खबरदारी?- जिल्हा कोषागार कार्यालयातून सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांची मासिक पेन्शन यापुढे शासनाच्या ई-कुबेर प्रणाली मार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेतून थेट पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती रमेश शिसव यांनी दिली. - ज्या पेन्शनधारकांनी परस्पर बँक खात्यात बदल करून घेतले असतील, त्यांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल, तेच खाते सुरू ठेवावे, भविष्यात पेन्शनबाबत अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनMaharashtraमहाराष्ट्र