शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बँकांंकडील पीककर्जही माफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 06:42 IST

कृषी कर्जमाफी योजना; आधार कार्ड प्रमाणीकरण अनिवार्य

- अतुल कुलकर्णी मुंबई : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतंर्गत राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती, ग्रामीण बँकांबरोबरच खासगी बँकांकडील २ लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीचे पीककर्जही माफ होणार आहे.शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक झाली. सहकार मंत्री जयंत पाटील, मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते. याआधी भाजप सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत खाजगी बँकांचा समावेश नव्हता. आता अशा बँकांचा समावेश झाल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. नव्या कर्जमुक्ती योजनेमुळे राज्यातील ३० लाख शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करणे अनिवार्य आहे. ज्यांची खाती आधार कार्डाशी संलग्न नसतील अशा कर्जखात्यांची यादी ७ जानेवारी पर्यंत प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले कर्जखाते आधारसंलग्न करुन घ्यायचे आहे. ही प्रक्रिया राबविताना शेतकºयांना शासकीय यंत्रणेने वेठीला धरू नये, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना बजावले आहे. या आधीची कर्जमाफीची योजना बँका जी माहिती देतील त्यावर आधारित होती, मात्र ही योजना राज्यातील महसूल विभागाने राबवायची आहे. आधार प्रमाणीकरणासाठी इंटरनेटची आवश्यकता असून ज्या दुर्गम भागात इंटरनेट सुविधा नाही अशा गावातील शेतकऱ्यांना नजिकच्या गावात न्यावे. तेथील ‘आपले सरकार’ केंद्रावर आधार प्रमाणिकरण आणि अन्य बाबी पूर्ण कराव्यात. त्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागणार नाही म्हणून बसची व्यवस्था करा, एकाच दिवशी असे जेवढे शेतकरी असतील त्यांना बसमध्ये बसवून न्या, त्यांचे आधार लिंक करा आणि परत त्यांना गावात आणून सोडा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले....तर बँकावर देखील कारवाई करू - अजित पवारबँकांनी पीक कर्जाऐवजी अन्य कर्ज खात्याची यादी दिली तर तशा याद्या देणाºया बँक अधिकाºयांवर तसेच शेतकºयांची चुकीची यादी देणाºया जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँकांवर कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.कोणत्या प्रकारचे कर्ज माफ होणार?हंगामी पीक कर्ज व किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत देण्यात आलेले २ लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदत पीक कर्ज, तसेच मध्यम मुदत कर्जात रुपांतरित केलेले अल्प मुदत पीक कर्ज जे पुनर्गठित केलेले असेल. यात सोने तारण ठेवून घेतलेल्या पीक कर्जाचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही.शेतकºयांना सन्मानाने वागवाशेतकºयांना कर्जमुक्त करताना कुठलीही अट नको. त्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. सन्मानाने कर्जमुक्तीचा लाभ मिळावा याकरिता महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आखली आहे हे त्यांना कळू द्या, ही योजना राबविताना महसूल यंत्रणेची मोठी जबाबदारी आहे. यंत्रणांनी शेतकºयांना आपुलकीची वागणूक द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.कोणत्या काळातील कर्ज माफ होईल?१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वितरीत केलेले कर्ज.३० सप्टेंबर २०१९ अखेर थकीत (मुद्दल + व्याज) व परतफेड न केलेले कर्ज.पुनर्गठित कर्ज१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वितरीत केलेले अल्प मुदत पीक कर्ज३१ मार्च २०१९ अखेर मध्यम मुदत कर्जात रुपांतरित कर्ज.पुनर्गठित कर्जाचे दि.३० सप्टेंबर २०१९ अखेर थकीत (मुद्दल+व्याज मिळून) आणि परतफेड न झालेले हप्ते.

टॅग्स :Farmerशेतकरी