लोकमत न्यूज नेटवर्कभिलार (जि.सातारा) : मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेल्या पुस्तकांच्या गावाला म्हणजेच भिलारमध्ये शुक्रवारी पहिले वाचक आले ते ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार. कोणताही डामडौल न करता कुटुंबियांसमवेत आलेल्या पवार बराच वेळ येथील पुस्तकांमध्ये रमले होते. हे दृश्य पाहून गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरही कौतुक दिसत होते.देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते अशी शरद पवार यांची ओळख असली तरी साहित्य क्षेत्रातील कलंदर रसिक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. सतत नवनवीन पुस्तके वाचण्याचा त्यांचा परिपाठ आजही कायम आहे. अलिकडेच ‘लोक माझे सांगाती’ हे त्यांचे आत्मकथन नुकतेच प्रकाशीत झाले आहे. त्यातूनही त्यांना असलेली साहित्याची ओढ स्पष्ट होते. तर असे हे पवारसाहेब शुक्रवारी भिलारमध्ये आले, तेव्हा सर्वच ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का बसला.
पुस्तकांच्या गावाला पवारांची भेट
By admin | Updated: May 6, 2017 03:35 IST