शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राज्याच्या पाण्यासाठी पवारांना साकडे , गुजरात निवडणुकीपूर्वी अंतिम करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 04:32 IST

केंद्र सरकारने दमणगंगा - पिंजाळ आणि नार-पार लिंक या दोन्ही प्रकल्पांमधील राज्याचे हक्काचे पाणी गुजरातला वळविण्यासाठी पूर्णत: जोर लावला

नाशिक : केंद्र सरकारने दमणगंगा - पिंजाळ आणि नार-पार लिंक या दोन्ही प्रकल्पांमधील राज्याचे हक्काचे पाणी गुजरातला वळविण्यासाठी पूर्णत: जोर लावला असल्याचे सांगत जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासमोर रविवारी हे सर्व प्रात्यक्षिकासह मांडून त्याकडे लक्ष घालण्याचे साकडे घातले़विशेष म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाणी वाटपाचा अंतिम करार करण्याचा आग्रह केंद्राने धरला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये बैठक झाली आहे़ अंतिम करार झाल्यास महाराष्ट्राला आपल्या हक्कावर ‘पाणी’ सोडावे लागेल, अशी भूमिका जाधव यांनी घेतली.सोमवारच्या शेतकरी अभियानाच्या समारोपासाठी पवार हे रविवारी नाशिकमध्ये आले. जाधव यांनी त्यांची भेट घेऊन महाराष्ट्र व गुजरात पाणी प्रश्नाबाबत आराखड्यासह सविस्तर सादरीकरण केले़ दमणगंगा-पिंजाळ लिंक या प्रकल्पातील एकूण ८३ टीएमसी पाण्यापैकी २० टीएमसी पाणी मुंबईला तर उरलेले ६३ टीएमसी पाणी गुजरातला जाणार आहे़तर नार-पार लिंकमधील ८४ टीएमसी पाण्यापैकी केवळ १० टीएमसी पाण्यावर महाराष्ट्राने आपला अधिकार असल्याचे सांगितले आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तापी खोºयातून मराठवाड्याला पाणी दिले जाणार असल्याचे सांगत असले तरी याबाबतचा कोणताही प्रक ल्प अहवाल महाराष्ट्राने तयार केलेला नाही, असे जाधव यांनी सांगितले.तापी खोºयातून नवसारी येथे पाणी नेण्याबाबतचा प्रकल्प अहवाल गुजरात राज्याने युद्धपातळीवर तयार करून घेतला आहे़ अंतिम करारावर महाराष्ट्राने स्वाक्षरी केल्यास ५४ टीएमसी पाण्यावर कायमस्वरूपी हक्क सोडावा लागेल, अशी भूमिका पवार यांच्यासमोर जाधव यांनी मांडली़दमणगंगा - पिंजाळ आणि नार-पार लिंक प्रकल्पाच्या सादरीकरणानंतर पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला़ या प्रश्नाबाबत सोमवारी यशवंतराव चव्हाण सेंटरवर बैठक होत आहे. यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जलसंपदा विभागाच्या सचिवांसमोर आराखड्याचे सादरीकरण होईल. नितीन गडकरी यांची भेट घेऊन राज्याच्या हक्काचे पाणी वाचविण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन पवार यांनी दिल्याचे जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारGovernmentसरकार