शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात अल्पवयीन चोरांकडून 25 बाईक्स जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 15:05 IST

गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणा-या दोन सराईत अल्पवयीन चोरांसह तीन जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तिघांकडून चोरी केलेल्या 25 बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत.  

वाकड (पुणे), दि. 31 - गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणा-या दोन सराईत अल्पवयीन चोरांसह तीन जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तिघांकडून चोरी केलेल्या 25 बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत.  केशव शेटे ( वय 34 ) यांच्यासह वाकड महातोबा नगर येथील दोन अल्पवयीन चोरट्यांना अटक केली आहे. या प्रकरणी वाकड तपास पथकाचे सहायक निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार,  तपास पथकातील पोलीस नाईक यादव यांना म्हातोबा नगर येथे राहणारे दोन अल्पवयीन चोर केवळ चैन करण्यासाठी चोऱ्या करत असल्याची महिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून या चोरांना वाकड येथून ताब्यात घेण्यात आले. 

ताब्यात घेतल्यानंकर चोरट्यांनी वाकड, भोसरी, दिघी, आणि पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 18 बाईक्स चोरल्याची महिती समोर आली. या तपासादरम्यान बीड परळी येथील केशव शेटे या सराईत चोरट्यानेदेखील शहरात अनेक चोऱ्या केल्याची माहिती पोलीस नाईक एम. आर. नदाफ यांना मिळाली. त्यांनी तात्काळ बीड येथे सापळा रचून शेटेला अटक केली. 

त्याने शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ७ बाईक्स चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक निरीक्षक बालाजी पांढरे कर्मचारी धनराज किरनाळे, दादा पवार, के.एल. बनसुडे, गणेश हजारे, एम.आर.नदाफ, शाम बाबा यांनी केली .