लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पटोले यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी प्रचंड घसरल्याने त्याची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा पटोले यांनी व्यक्त केली आहे.
मला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर चार वर्ष पूर्ण झाली असून आता प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करावी, तसेच नवी कमिटी स्थापन करून मला पदातून मुक्त करावे, असे पटोलेंनी लिहिल्याचे सूत्रांनी सांगितले.
आताच राजीनामा का?nकाँग्रेसने विधिमंडळ पक्षनेतेपदावर अद्याप कुणाची नियुक्ती केली नाही. विधिमंडळ पक्षाने याबाबत निर्णयाचे अधिकार पक्षश्रेष्ठींना दिले आहेत. nपटोले यांना आता विधिमंडळ पक्षनेतेपद हवे आहे, त्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. nस्थानिक संस्थांच्या निवडणुका आपल्या नेतृत्वाखाली लढवल्या आणि त्यात पराभव झाला तर पक्षातील वजन खूप कमी होईल, अशी भीतीही पटोले यांना वाटत असल्याचे बोलले जात आहे.