शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

संपाचा फटका रुग्णांना! मुलाचा अपघात, मेंदूला गाठ अन् रुग्णालयात डॉक्टरच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 10:07 IST

पुण्याच्या ससून रुग्णालयात केवळ शहरातूनच नव्हे तर राज्याच्या विविध भागातून लोक उपचारासाठी येत असतात.

पुणे - जुनी पेन्शन सुरू करावी यासाठी मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या संपामुळे राज्यात अनेक ठिकाणी सर्वसामान्यांना फटका बसत आहे. त्यात सरकारी डॉक्टरांनीही संपात सहभाग घेतल्यामुळे रुग्णांचे हाल सुरू झाले आहेत. पुण्यात अपघातानंतर मुलाला हॉस्पिटलला आणले परंतु मुख्य डॉक्टरच संपावर गेलेत अशी परिस्थिती आलीय. आईनं ही व्यथा माध्यमांसमोर मांडली. 

पुण्याच्या ससून रुग्णालयात केवळ शहरातूनच नव्हे तर राज्याच्या विविध भागातून लोक उपचारासाठी येत असतात. याठिकाणी डॉक्टरांच्या संपाचा दिवस सुरू झाल्याने रुग्णांचे हाल सुरू आहेत. यातच मुलाचा अपघात झाल्यानंतर त्याला उपचारासाठी कुटुंब ससून रुग्णालयात घेऊन आले. यावेळी मुलाच्या आईनं म्हटलं की, मुलाच्या मेंदूला गाठ आलीय. कालपासून डॉक्टर रुग्णालयात आले नाही. अपघातामुळे मेंदूला मार लागलाय. आपत्कालीन स्थिती आहे असं आईनं सांगितले. 

तर सरकारने ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण कराव्यात आणि लवकरात लवकर हा संप मिटवावा. सध्या नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी लवकर यावे, रुग्णांवर उपचार करावे अशी मागणी कुटुंबाने केली आहे. त्यामुळे या परिस्थितीमुळे रुग्णांच्या कुटुंबावर ताण निर्माण झाला आहे. सरकारी रुग्णालयात मुख्य डॉक्टर येत नसल्याने आमच्या रुग्णाचे काय होणार अशी चिंता कुटुंबाला लागली आहे. त्यामुळे या परिस्थितीवर लवकर तोडगा काढण्याचं काम सरकारला करावं लागणार आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवसराज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत बेमुदत संपाचा पवित्र घेतलाय. त्यानुसार, पहिल्या दिवशी राज्यातील सर्वच विभागात कर्मचाऱ्यांनी काम बंद करुन सरकारचे लक्ष्य वेधले. आज संपाचा दुसरा दिवस आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा करत कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मंगळवारी विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदनही केले.