शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर बंद झाल्याने प्रवाशांना फटका; मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अनेक गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 13:39 IST

रेल्वे मंत्रालयाने पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : पॅसेंजर गाड्या बंद करून त्यांच्या जागी कमी अंतरासाठी मेमू गाडीच्या फेऱ्या आणि  लांब पल्ल्यासाठी चालवल्या जाणाऱ्या पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्यात आले आहे. मध्य आणि  पश्चिम रेल्वेच्या काही पॅसेंजर गाड्या बंद झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. दरम्यान, पर्यायी व्यवस्था न करता या  पॅसेंजर गाड्या बंद केल्यामुळे प्रवासी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. 

रेल्वे मंत्रालयाने पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावर पूर्वीच्या वलसाड, सुरत, भरूच पॅसेंजरच्या जागी मेमू गाड्यांच्या फेऱ्या तर पूर्वीच्या दोन अहमदाबाद पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये बदलून चालवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर पूर्वीची रत्नागिरी पॅसेंजर मध्य रेल्वेच्या हद्दीत एक्स्प्रेस म्हणून तर कोकण रेल्वेच्या हद्दीत पॅसेंजर म्हणून पारंपरिक पद्धतीने चालवली जात आहे. तर, सावंतवाडी पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करून चालवली जात आहे. 

तसेच मध्य रेल्वे प्रशासनाने पर्यायी इतर कोणतीही सोय न करता गेल्या कित्येक वर्षांपासून पनवेल - पुणे - पनवेल पॅसेंजर बंद करून टाकली आहे, तर मुंबई - भुसावळ - मुंबई पॅसेंजर बंद करून ही गाडी इगतपुरी - भुसावळ दरम्यान मेमू गाडीव्दारे चालवली जाते. त्यामुळे लोणावळा ते पुणे दरम्यानच्या लहान स्टेशनवर थेट प्रवास करणे अशक्य झाले असून प्रवाशांना कर्जत व लोणावळा अशा दोन ठिकाणी गाड्या बदलून व कर्जत - लोणावळा दरम्यान लांबपल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेसने प्रवास करून ये-जा करावी लागत आहे. 

प्रवाशांची  गैरसोय : मुंबई परिसरातून इगतपुरी ते भुसावळ दरम्यानच्या छोट्या स्थानकांवरून थेट प्रवास करणे अशक्य झाले असून प्रवाशांना कसारा व इगतपुरी अशा दोन ठिकाणी गाड्या बदलून व कसारा - इगतपुरी दरम्यान लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसने प्रवास करून जा-ये करावी लागत आहे. त्यातही रेल्वेने अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे कसारा व इगतपुरी हाॅल्ट गेल्या काही वर्षांत रद्द केले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. 

आम्ही रेल्वे मंत्रालयाचा निर्णयाचा निषेध करतो, प्रवाशांची पर्यायी व्यवस्था न करता गाड्या रूपांतरित करणे योग्य नाही. रेल्वेने मुंबई - भुसावळ व पनवेल - पुणे पॅसेंजरच्या फेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात.     - नंदकुमार देशमुख,  अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ 

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेpassengerप्रवासी