लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लहानपणापासूनच जोशपूर्ण भाषण देणाऱ्या ज्योती वाघमारे यांचा आवाज आता संसदेतही घुमणार आहे. विविध कार्यक्रमात सूत्रसंचालन करत अवघ्या सोलापूरकरांची मने जिंकलेल्या ज्योती यांनी पत्रकारिताही केली. अभ्यासातही हुशार असलेल्या ज्योती यांनी वालचंद कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन तेथेच प्राध्यापक म्हणून काम केले. काही काळ त्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे काम केले. परंतु त्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशावरच लक्ष केंद्रीत केले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर या फायरब्रँड महिलेला शिंदेसेनेेने पक्षात संधी दिली. ज्योती यांच्या रूपाने सोलापूरला आता आणखी एक खासदार मिळाला आहे.
पक्षातील प्रस्थापित नेत्यांना बाजूला सारत एकनाथ शिंदे यांनी डाॅ.ज्योती वाघमारे यांना संधी देत धक्कातंत्र अवलंबिले. ठाणे, मुंबई एमएमआरमधील नेत्याऐवजी त्यांनी सोलापूरच्या वाघमारे यांच्या नावाला पसंती दिली. पक्षात भाकरी फिरविण्याची ही सुरुवात असल्याचे स्पष्ट संकेत शिंदे यांनी या निमित्ताने दिले. तसेच मागासवर्गीय समाजाच्या महिला नेत्याला राज्यसभेत पाठवून त्यांनी वेगळा संदेशही दिला.
मायाताई कौतुकाचा विषय : नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते या विधानभवनात अर्ज भरायला आल्या तेव्हा कौतुकाचा विषय ठरल्या. भाजपचे अनेक आमदार त्यांना आवर्जून भेटले. मला भरून आले आहे, असे माया इवनाते म्हणाल्या. माजी आमदार रामराव वडकुते हे राज्यसभेची संधी दिल्याबद्दल पक्षनेतृत्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी खूपच भारावून बोलत होते.
Web Summary : Shiv Sena's Eknath Shinde nominated Jyoti Waghmare, a professor and former Congress worker, to the Rajya Sabha, surprising established leaders. BJP's choice of Maya Ivnate and Ramrao Wadkute also highlights a shift towards recognizing grassroots leaders and backward class communities, signaling a new direction in party nominations.
Web Summary : शिवसेना के एकनाथ शिंदे ने ज्योति वाघमारे को राज्यसभा के लिए नामांकित किया, जिससे स्थापित नेता हैरान रह गए। बीजेपी द्वारा माया इवनाते और रामराव वडकुटे का चुनाव जमीनी स्तर के नेताओं और पिछड़े वर्ग के समुदायों को पहचानने की ओर इशारा करता है, जो पार्टी नामांकन में एक नई दिशा का संकेत है।