शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनो, आपल्या मुलांंनाही वासनेच्या शिकारीपासून वाचवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 06:42 IST

कायद्याचे अज्ञान । मुलाची इज्जत कधीच जात नसल्याचा गैरसमज; पोक्सोअंतर्गत होऊ शकतो गुन्हा

दत्ता यादव सातारा : अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत आहेत, हे आपण ऐकतो अन् वृत्तपत्रांमध्ये वाचतही आलो आहोत. मात्र, अल्पवयीन मुलांवरही अनेक ठिकाणी अत्याचार होत असताना या घटना समाजासमोर येत नाहीत. ‘मुलाची इज्जत कधीच जात नाही’, असा पालकांमध्येगैरसमज असल्यामुळे मुलांच्या तक्रारींचा ओघ अत्यंत कमी आहे. गत पाच वर्षांत सातारा जिल्ह्यात केवळ दोन अल्पवयीन मुलांच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतलीय. मुलींप्रमाणे अल्पवयीन मुलांचाही लैंगिक छळ झाल्यास पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल होतो, हे अनेक पालकांना माहितीच नसल्याचे समोर आले आहे.

अल्पवयीन मुलींच्या तुलनेत अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटना अत्यंत कमी असल्याचा अहवाल शासनदरबारी नोंद आहे. याचा अर्थ असा नाही की, अल्पवयीन मुलांवर अत्याचार होतच नाहीत. मात्र, जितक्या तीव्रतेने मुलींवरील अत्याचार झाल्यानंतर पालक सजग होतात. तितक्या तीव्रतेने मुलांवर अत्याचार झाल्यानंतर पालक सजग राहात नाहीत, हे कायदेतज्ज्ञ आणि पोलिसांच्या निष्कर्षांमधून समोर आलंय. समाजामध्ये अनेकदा अल्पवयीन मुलांवर अत्याचाराच्या घटना घडतायत. मात्र, यातील काही प्रकार समोर येतात तर काही प्रकरणे समोर यायच्या आधीच दाबली जातात. याची कारणे कायदेतज्ज्ञांनी शोधली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

कसा होतो मुलांचा लैंगिक छळ?अश्लील चित्रफीत बनविण्यासाठी मुलांचा वापर केला जातो. लैंगिक भावनेने मुलाला स्पर्श करणे, आवाज करणे, हावभाव करणे, अवयव दाखविण्यास प्रवृत्त करणे, उत्तेजित करण्यासाठी त्या हेतूने हाताळणे, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा करण्यासाठी मुलाला प्रवृत्त करणे, अशा प्रकारे अल्पवयीन मुलांवर अत्याचार होत असतात.

माहिती लपविणाऱ्यालाही शिक्षा : विशेषत: शाळांमध्ये बालकांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर येते. अशी घटना तत्काळ पोलिसांना सांगणे गरजेचे असते. मात्र, काहीजण संस्थेची बदनामी होईल म्हणून पोलिसांना माहिती देत नाहीत. अशा संस्थाचालकांना पोक्सो कायद्याअंतर्गत एक वर्षाची शिक्षा होऊ शकते.अशा आहेत या दोन घटना...आठ वर्षांचा मुलगा साताºयातील एका मैदानात दुपारी साडेतीनच्या सुमारास खेळत होता. त्यावेळी तेथे एक युवक आला. त्याने, ‘‘चल आपण या मैदानावर टेबल घेऊन येऊ,’’ असे म्हणून त्या मुलाला दुचाकीवर बसवून घेऊन गेला. निर्जनस्थळी उसाच्या शेतामध्ये गेल्यानंतर त्या मुलाचे तोंड आणि हात त्याने बांधले. त्यानंतर मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून पसार झाला. मुलाने केलेल्या वर्णनावरून पोलिसांनी त्याला अखेर बेड्या ठोकल्या. ही घटना १९ मे २०१४ रोजी घडली होती. हा खटला सध्या न्यायप्रविष्ठ आहे. दुसरी घटना एका शाळेमध्ये घडली आहे. शाळेतील शिक्षकाने स्वच्छतागृहामध्ये नेऊन एका अल्पवयीन मुलाशी लैंगिक कृत्य केले होते. गत पाच वर्षांतील केवळ या दोनच घटना समाजासमोर आल्या आहेत.एखाद्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे त्याच्या पालकांना आणि घरातल्यांना समजल्यानंतर मूळ मुद्दा येतो तो म्हणजे, आपला मुलगा आहे. मुलगी तर नाही ना, मुलाच्या इज्जतीला डाग लागणार नाही, अशी मनाची समजूत घालून पालक सोयीस्कररित्या या घटनेकडे दुर्लक्ष करतात. काही घटनांमध्ये इभ्रतीचाही विचार केला जातोय. ज्या पद्धतीने मुलींना वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागते.तशा पद्धतीने मुलांची चाचणी होत नसल्याचा गैरसमज अनेक पालकांमध्ये आहे. एवढेच नव्हे तर मुलींवर लैंगिक अत्याचार केलेल्या आरोपीला कडक शासन होऊ शकते, तसे मुलावर अत्याचार झाला तर त्याला फारसी शिक्षा होत नाही, अशा प्रकारचे अनेक समज-गैरसमज पालकांमध्ये असल्यामुळे तक्रारीही पुढे येत नाहीत. परिणामी अशा मुलांची अक्षरश: घुसमटच होत असते. या घृणास्पद गुन्ह्याच्या प्रकारामध्येही मुलगा आणि मुलगी अशी तुलना करून पालक याकडे डोळेझाक करतात. त्यामुळेच अनेक मुले वासनांध व्यक्तींकडून बळी ठरत आहेत. मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता पालकांनी तक्रारीसाठी पुढे यायला हवे, असे पोलीस अधिकाऱ्यांचेही मत आहे.पोक्सो कायदा लिंगभेद निरपेक्ष...लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण करणारा हा पोक्सो कायदा आहे. हा कायदा लिंगभेद निरपेक्ष आहे. अत्याचार करणारी व्यक्ती पुरुष, स्त्री किंवा तृतीयपंथी असू शकते. संमती आहे, असे संरक्षण या कायद्यामध्ये नाही. म्हणून गुन्हेगाराची सुटका होत नाही. गुन्ह्याच्या तीव्रतेवर आरोपीला शिक्षा दिली जाते.मुलांच्या केसमध्ये आपापसात तडजोड होतेयकोणतीही लैंगिक कृती हा कायद्याने गुन्हा आहे. ज्या प्रमाणे मुलींच्या केसेस पुढे येतात. त्या मानाने मुलांच्या पुढे येत नाहीत. आपापसात तडजोड होतेय. कुठलीही गोष्ट तक्रार केली तर तो गुन्हा होतो; पण तुम्ही तक्रार केलीच नाही तर तो गुन्हा होणारच नाही. त्यामुळे मुलांच्या पालकांनीही तक्रारींसाठी पुढे यायला हवे. - अ‍ॅड़ पूनम इनामदार, सदस्य विधी सेवा प्राधिकरण, सातारा