शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाविरोधात पालक न्यायालयात; खुल्या गटाच्या जागा कमी झाल्याने निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 08:25 IST

आरक्षणाबाबतचा निर्णय २६ फेब्रुवारीपासून लागू झाला. यामुळे खुल्या गटातील १० टक्के जागा कमी होणार असल्याने पालकांनी या आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास समाजाकरिता राज्यातील शिक्षणसंस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या १० आरक्षणाविरोधात पालक पुन्हा एकदा न्यायालयात दाद मागणार आहेत.

आरक्षणाबाबतचा निर्णय २६ फेब्रुवारीपासून लागू झाला. यामुळे खुल्या गटातील १० टक्के जागा कमी होणार असल्याने पालकांनी या आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांनी याकरिता पुढाकार घेतला आहे. १० टक्के आरक्षणामुळे खुल्या गटाच्या सरकारी महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमाच्या ४०० तर खासगी महाविद्यालयांतील ३०० जागा कमी होणार आहेत.

वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता तर खूपच कमी जागा उपलब्ध असतात. तिथे आरक्षणाचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याशिवाय गत्यंतर नाही, असे पालकांच्या प्रतिनिधी सुधा शेणॉय यांनी सांगितले. या निर्णयाला स्थगिती मिळू नये म्हणून राज्य सरकारने उच्च न्यायालयात कॅव्हेट लागू केले आहे. त्यामुळे आमचा लढा सोपा नसेल. मुलांच्या भवितव्यासाठी आम्हाला ही याचिका करावी लागेल, असे शेणॉय यांनी स्पष्ट केले.

तीन वर्षांचा न्यायालयीन लढान्यायालयाने यापूर्वी २०१४ आणि २०१८ साली लागू करण्यात आलेले आरक्षण मराठा समाज हा मागास नाही, असे मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले होते. २०१८ साली लागू कऱण्यात आलेल्या आरक्षणाविरोधात पालकांना तीन वर्षे लढा द्यावा लागला होता.

एकूण आरक्षण ६२ टक्केमराठा समाजाला १० टक्के आरक्षण लागू करण्याचा कायदा करण्यात आल्याने राज्य सरकारच्या वतीने विविध समाज घटकांना देण्यात येणाऱ्या आरक्षणाचे प्रमाण हे आता ६२ टक्के झाले आहे. हे आधी ५२ टक्के होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण लागू करावे लागते.  त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे ६२ टक्के आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकविणे हे आव्हान असेल.

आरक्षणापेक्षा आर्थिक मदतीची गरजहुशार, होतकरू; पण गरीब विद्यार्थ्यांना कुठल्याही आरक्षणाची गरज नाही. त्यांना जर कसली गरज असेल तर ती आर्थिक मदतीची. अनेक विद्यार्थी त्यांच्या गुणांच्या आधारे चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवण्यास यशस्वी होतात. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना खासगी तर सोडाच, सरकारी कॉलेजांचे शुल्क भरणेही परवडत नाही. त्यामुळे आरक्षण लागू करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्यापेक्षा हुशार पण गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात सरकारने पुढाकार घ्यावा.- सुधा शेणॉय, पालक

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणCourtन्यायालय