शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 06:24 IST

वाहनांची तोडफोड, पोलिसांवर दगडफेक, बाजारपेठ बंद

लोकमत न्यूज नेटवर्क  परभणी : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची माथेफिरूने तोडफोड केल्याची घटना १० डिसेंबरला घडली होती. त्या निषेधार्थ आयोजित बंदला हिंसक वळण लागल्याने बुधवारी दुपारनंतर शहरात जमावबंदी लागू करावी लागली. परिस्थिती नियंत्रणात आली तरीही तणाव कायम आहे. एसआरपीएफच्या सहा तुकड्या मागविण्यात आल्या आहेत.

परभणी जिल्ह्यात आंबेडकरी जनतेने बंदची हाक दिली होती. सकाळी नऊ वाजल्यापासून परभणी शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर टायर जाळून चक्का जाम करण्यात आला होता. दुपारपर्यंत विविध भागांतील समर्थक आंदोलनात सहभागी होत गेले. 

डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातही मोठा जमाव जमला. सगळे शांततेत सुरू होते. मात्र, दुपारी १२ वाजल्यानंतर काही तरुणांनी दुकानाच्या शटरवर दगडफेक केली. फलक काढून रस्त्यावर जाळले. दोन वाहनांची तोडफोड केली. दोन वाहने जाळली. यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी जमावबंदी लागू करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाला केली. तोपर्यंत विविध भागातील शेकडो वाहने व दुकानांसमोर  असलेले सामान आंदोलकांनी नासधूस करून खराब केले अथवा पेटवून दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवरील संचिका फेकल्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी काहीजण गेले होते. तेथेही काचा फोडल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना घेराव घातला. तसेच त्यांच्या टेबलवरील संचिका महिलांनी फेकून दिल्या. 

इंटरनेट सेवा बंद : जिल्ह्यात कलम १६३ लागू करून पाचपेक्षा जास्त जणांना एकत्र जमण्यास मनाई केली. इंटरनेट, झेरॉक्स, आदी सेवा बंद करण्यास आदेशित केले. स्टेशन रोड व पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर पोलिसांवरच दगडफेक झाली. अधिकची कुमक आल्यानंतर पोलिसांनी आधी अश्रुधुराचा वापर केला. नंतर सौम्य बळाचा वापर केला.  

मुख्य आरोपी अटकेत आहे. गुन्हाही दाखल केला. गरज पडल्यास आणखी सखोल चौकशी करून यामागे कुणी आहे का? याचा शोध लावला जाईल. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविले जाईल.      - रघुनाथ गावडे, जिल्हाधिकारी, परभणी

परिस्थिती नियंत्रणात आणण्यास एसआरपीएफ तुकडी मागविली आहे. कोणीही सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करू नये. सर्वांनी शांतता राखावी.    - शहाजी उमाप,     विशेष पोलिस उपमहानिरीक्षक

टॅग्स :Parbhani policeपरभणी पोलीस