शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
3
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
4
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
5
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
6
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
7
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
8
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
9
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
10
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
11
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
12
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
14
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
15
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
17
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
18
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
19
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
20
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   

पापा कमिंग लेट !

By admin | Updated: August 5, 2016 04:44 IST

‘पापा वुड कमिंग लेट’ हे उद्गार आहेत महाडच्या अपघातात बेपत्ता झालेल्या जयेश गोपाळ बाणे (३६) यांच्या दोन जुळ्या मुलांचे.

गौरी टेंबकर-कलगुटकर,

मुंबई- ‘पापा वुड कमिंग लेट’ हे उद्गार आहेत महाडच्या अपघातात बेपत्ता झालेल्या जयेश गोपाळ बाणे (३६) यांच्या दोन जुळ्या मुलांचे. आपले वडील कामावरून उशिरा परत येणार आहेत, इतकंच त्यांना माहीत आहे, कारण अद्याप त्यांचे वडील किती भयंकर अपघातात सापडले आहेत, याचा साधा अंदाजही या चिमुकल्यांना नाही.बोरीवलीच्या बाभई नाका परिसरात असणाऱ्या द्वारका कुटीर इमारतीत राहणारे जयेश हे गोरेगावात एका खासगी कंपनीत काम करतात, बोरीवलीत ते त्यांचे वडील गोपाळ बाणे, पत्नी सायली आणि दोन जुळी मुले मयांक आणि मृण्मयी यांच्या सोबत राहत होते. बाणे यांची दोन्ही मुले इयत्ता नववीत शिकतात. सोमवारी परतणारे वडील अजून कसे घरी परतले नाहीत, असा प्रश्न ते वारंवार आई आणि आजोबांना विचारतात. तेव्हा ‘पापा वुड कमिंग लेट’, इतकंच आम्ही त्यांना सांगितल्याचे जयेशचे भावोजी महेश मेटेलू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. घरात टीव्ही आणि पेपर बंद केलाय आणि भेटायला येणाऱ्या नातेवाइकांनीही घरात रडारड करू नये, असे बजावण्यात आल्याचे महेश यांनी नमूद केले.रविवारी राजापूरला तहसीलदार कार्यालयात जयेश काही कामासाठी गेले. त्याच रात्री परतीच्या वाटेवर असताना त्याने साडेनऊला चिपळूणमधून फोन केला. सकाळी दादरला पोहोचूनफोन करतो, असे सांगून फोनठेवला, तो अद्याप उचललेलाचनाही, असे एका खासगी कंपनीतकाम करणाऱ्या त्यांच्या पत्नीने सांगितले.>मामाच्या श्राद्धासाठीगेला आणि...महाड बस अपघातात बळी गेलेला अजून एक नाव म्हणजे प्रशांत प्रकाश माने (३३) जे जोगेश्वरीमध्ये आई, पत्नी आणि आठ महिन्यांच्या मुलीसोबत राहत होते. मामाच्या श्राद्धासाठी मिरवणे या गावी गेलेले माने हे अद्याप परतलेले नाहीत. त्यामुळे आपल्या माणसाचे नेमके काय झाले ही चिंता या कुटुंबीयांसाठी नरकयातना ठरत आहे.माने हे सीप्झ परिसरात एका कंपनीत कामाला होते. जोगेश्वरी पूर्वच्या शिवटेकडी परिसरातील शाळेजवळ ते पत्नी सुषमा, आठ महिन्यांची मुलगी, आई प्रतिभा यांच्यासोबत राहत होते. घरात कमविणारे ते एकटेच असल्याने हे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होते. मामाचे श्राद्ध असल्याने प्रशांत मिरवणे या त्यांच्या गावी गेले होते. आम्हाला अपघाताची बातमी समजली. तेव्हापासून त्यांना आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे सुषमा यांनी सांगितले.