शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा नाकारली परवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 15:41 IST

महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा भगवान गडावर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला होणा-या दस-या मेळाव्यात पंकजा मुंडेंना भगवान गडावर येण्यास प्रतिबंध घातले आहेत. भगवान बाबांना वंजारी समाजात संतांचा दर्जा असल्याने भगवानगड हा वंजारी समाजाचं अढळ श्रद्धास्थान आहे.

बीड, दि. 12 - महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा भगवान गडावर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला होणा-या दस-या मेळाव्यात पंकजा मुंडेंना भगवान गडावर येण्यास प्रतिबंध घातले आहेत. भगवान बाबांना वंजारी समाजात संतांचा दर्जा असल्याने भगवानगड हा वंजारी समाजाचं अढळ श्रद्धास्थान आहे. पण हाच भगवानगड राजकीय वर्चस्ववादाचं केंद्रबिंदू बनला आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गडाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर होऊ द्यायला तीव्र विरोध केला असून, त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पंकजा मुंडेंना परवानगी नाकारली आहे. गेल्या वर्षी भगवान गडाच्या दसरा मेळाव्यावरून पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. या ऑडिओ क्लिपमध्ये नामदेव शास्त्रींना धमकी दिली होती. दसरा मेळाव्यानंतर नामदेव शास्त्रींना काय करायचं आपण भविष्यात पाहून घेऊ, असं व्हायरल होणाऱ्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये पंकजा मुंडे म्हणत असल्याचे ऐकू येत होतं.भगवानगडाच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना भाषण करू द्यायला नामदेव शास्त्रींनी विरोध केलाय. तर आपण गडावर जाणारच, असा आक्रमक पवित्रा पंकजा मुंडेंनी घेतला होता. भगवानगडाचे हे महंत आता गडाचा राजकीय गैरवापर होऊ द्यायला कितीही विरोध करत असले तरी त्यांची नियुक्ती गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय आशीर्वादाने झालीय. पण गोपीनाथ मुंडेंचं निधन झाल्यापासून पंकजा मुंडे आणि महंत यांच्यातले संबंध दुरावले आणि त्यातूनच हा वाद चिघळला.