शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: फडणवीसांच्या कार्यक्रमाला का जात नाही? ठाकरे गटाची ऑफर स्वीकारणार का? पंकजा मुंडे म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 12:34 IST

Maharashtra News: भाजपच्या संस्कारात वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Politics: भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मध्यंतरी ठाकरे गटातील आमदाराने पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली होती. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यातही पंकजा मुंडे दिसल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस जातात, त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे जात नसल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या सर्वांवर पंकजा मुंडे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार प्रीतम मुंडे गेवराईत एकत्र आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे गटाकडून असलेल्या ऑफरविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर, माझ्या मनात कोणतीही खदखद नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी उत्तर दिले आहे. अध्यक्षांच्या उत्तराला मी परत ओव्हरटेक करत नाही. माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले हीच मोठी गोष्ट आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला का जात नाही?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे दिसत नाहीत, अशी चर्चा आहे. त्यामागचे कारण काय? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, मीही ती चर्चा ऐकली आहे. या मुद्द्यावर वेगळी पत्रकार परिषद घेईन, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले. माझ्या मनात खदखद आहे, अशा बातम्या लावण्याचे कारण नाही. फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले, त्या कार्यक्रमात मी अपेक्षित नव्हते. त्यामुळे मी आले नाही. मी भाजपच्या संस्कारात वाढलेली, मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळते, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप आहे.  या कपोलकल्पित बातम्या सोडून पंकजा यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे करण्याचे काम काही लोक करत आहेत. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राने पाहिले आहे. आयुष्यात आणि स्वप्नातही भाजपला साईडला करावे किंवा आपण साईडला व्हावे असे त्यांच्या मनात येत नाही. त्यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात मोठे वलय आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. त्यांना केंद्रीय पातळीवरील जबाबदारी आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस