शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे नाराज, कार्यकर्ते आक्रमक, देवेंद्र फडणवीस या मुद्द्यावर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 18:37 IST

Devendra Fadanvis & Pankaja Munde : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारी देण्यात न आल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनीही भाजपा तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई - भाजपाचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या सध्या भाजपावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारी देण्यात न आल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनीही भाजपा तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधातही तीव्र आंदोलन करत पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

पंकजा मुंडे नाराज आहेत का असा प्रश्न प्रसार माध्यमांनी विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंकजाताई भाजपाच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे मध्य प्रदेशचा प्रभार आहे. त्या सातत्याने मध्य प्रदेशला जात असतात. तिथे आता निवडणुका आहेत. तिथला प्रभार त्या सांभाळत आहेत. आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात असतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. भाजपा हा एक परिवार आहे आणि आम्ही सर्वजण या परिवाराचे घटक आहोत.

पंकजा मुंडे यांनी फडणवीस सरकारच्या काळात मंत्रिपद भुषवले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पंकजा मुंडेंचे चुलत भाऊ धनंजय  मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. तेव्हापासून पंकजा मुंडे या भाजपाच्या राजकारणात काहीशा मुख्य प्रवाहाबाहेर गेल्या आहेत. या काळात पक्षाने त्यांना राष्ट्रीय राजकारणात स्थान दिले होते. मात्र पंकजा मुंडे यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होता. मात्र पक्षाने त्यांचे अद्याप पुनर्वसन केलेले नाही. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPankaja Mundeपंकजा मुंडेPoliticsराजकारण