‘सवाई’मध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया...

By admin | Published: December 27, 2014 04:20 AM2014-12-27T04:20:24+5:302014-12-27T04:20:24+5:30

अवकाळी पावसाने स्थगित करण्यात आलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ पुन्हा दि. १ ते ४ जानेवारी दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल

Pandit Hariprasad Chaurasia in 'Sawai' ... | ‘सवाई’मध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया...

‘सवाई’मध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया...

Next

पुणे : अवकाळी पावसाने स्थगित करण्यात आलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ पुन्हा दि. १ ते ४ जानेवारी दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग मैदानावर रंगणार असून, नियोजित जुन्या-नव्या दिग्गज कलावंताबरोबरच ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया आणि उस्ताद मुबारक अली खां यांनाही ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
दरवर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवात ‘मेघमल्हार’ रागदारीचा नव्हे तर बरसणाऱ्या वर्षांसरींचा अनुभव घ्यावा लागल्याने रसिकांच्या आनंदावर विरजण पडले. त्यामुळे आर्य संगीत प्रसारक मंडळाला महोत्सव पुढे ढकलण्याची वेळ आली. त्यानुसार मंडळातर्फे महोत्सवाचे नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, दि. १ जानेवारी २०१५ रोजी सायंकाळी ५ वाजता तर इतर तिन्ही दिवशी महोत्सवास दुपारी ३ वाजता सुरूवात होणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. पहिल्या दिवशी पुरबायन चॅटर्जी ( सतार), आनंद भाटे, पद्मा देशपांडे (गायन) व पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे कलाविष्कार ऐकायला मिळतील. दि. २ जानेवारीला धनंजय हेगडे, सुमित्रा गुहा (गायन), ध्रुपद संच ( गुंदेचा बंधू व संवाद म्युझिक), डॉ. सुचेता भिडे-चापेकर ( भरतनाट्यम) आणि पं. अजय पोहनकर ( गायन) तर दि. ३ जानेवारी रोजी रमाकांत गायकवाड, श्रीवाणी जडे (गायन), बहाउद्दीन डागर (रूद्रवीणा), श्रीनिवास जोशी व मालिनी राजूरकर (गायन) यांचे सादरीकरण होईल. शेवटच्या दिवशी दि. ४ जानेवारीला अंबी सुब्रमण्यम (व्हायोलिन), मिता पंडित , उस्ताद मुबारक अली खां, पं. उल्हास कशाळकर (गायन) यांच्या कलाविष्कारांसह किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा गायनाने महोत्सवाचा समारोप होईल. दैनंदिन कार्यक्रमांची तिकिटे महोत्सवाच्या ठिकाणी एक तास आधी उपलब्ध होतील.

Web Title: Pandit Hariprasad Chaurasia in 'Sawai' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.