शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 10:45 IST

Pandharpur Wari 2025: लोकांना सोयीच्या कोणत्याही दिवशी कोणत्याही टप्प्यात सहभागी होता येईल, अशी व्यवस्था आयोजकांनी विकसित केली.

पुणे: आता पंढरीच्या वारीतही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ दिंडी पाहायला मिळणार आहे. यात ऑल इन्क्लुसिव्ह दिंडी, (विविध भाषा, प्रांत, वय आणि नोकरी/व्यवसायांतील लोकांना सामावून घेणारी), कृत्रिम  बुद्धिमत्तेचा वापर, आध्यात्मिक इंटेलिजन्स (नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवण्याचा एक प्रयत्न) आणि एआय म्हणजे मराठीत ‘आई’ अर्थात ‘माउली’ (भक्तांना आधार देणारी, प्रेमळ शक्ती) अशा 'एआय'च्या घटकांचा खुबीने वापर करण्यात आला आहे. परंपरेची ओळख सांगणारी व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी ही दिंडी यंदाच्या वारीचे आकर्षण ठरणार आहे.

अनेकांना वाटते की, फक्त आयटी क्षेत्रातीलच लोक या दिंडीत सहभागी होऊ शकतात का? घरातील अन्य व्यक्ती चालतील का? मी गृहिणी आहे अथवा निवृत्त आहे, मला सहभागी होता येईल का... इ. यासाठी अधिकाधिक लोकांना वारीमध्ये सहभागी करून त्यांना संस्कृतीची, वारकरी संप्रदायाची ओळख करून देणे आणि अद्भुत आध्यात्मिक अनुभवाची सुलभता निर्माण करणे या उद्देशाने वारीच्या पुणे ते पंढरपूर या टप्प्यांसाठी 'एआय दिंडी' या नावाने सेवा द्यायचे या टीमने ठरवले आहे.

एआय दिंडी काय करते?लोकांना सोयीच्या कोणत्याही दिवशी कोणत्याही टप्प्यात सहभागी होता येईल, अशी व्यवस्था आयोजकांनी विकसित केली आहे. ज्या दिवशी ज्या टप्प्यावर पालखी आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी पुण्याहून बसची व्यवस्था केली आहे. तसेच पुन्हा पुण्यात सोडण्याचीही व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे. वारीत चालताना आपल्याला अभंग म्हणता यावेत, टाळ वाजवता यावा, पावले खेळता यावीत यासाठी एआय दिंडी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे ‘भजनसंध्या आणि वारीतील खेळ’ आयोजित करते.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सPandharpurपंढरपूर