शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर वारी २०१९ : टप्पा टेकडी येथे टाळ, मृदुंग गजर व माऊली जयघोषात धावला विठुरायाचा वारकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 20:37 IST

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पंढरीस जात असताना वेळापूरनजीक टप्पा येथील टेकडीवरून त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले.

पंढरपूर : तुका म्हणे धावा.. आहे पंढरी विसावा...असे म्हणत वारकरी टाळ, मृदुंगाचा गजरात व माऊली माऊली  नामाच्या जयघोषात लहान्यापासून ते अबालवृद्ध वैष्णव धावत सुटले होते .पंढरपूर समीप आल्याने वारकर्‍यांमध्ये उत्साह जाणवत होता. आनंद व जल्लोषाच्या वातावरणात वारकऱ्यांनी धावा पूर्ण केल्या. वारकरी पांडुरंगाला भेटण्यासाठी उतावीळ होऊन ते झपाट्याने पावले टाकीत होते. पांडुरंगाची भेट होणार म्हणून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. यावेळी वारीच्या वाटेवरील नद्यांच्या ओढ्यात वारकऱ्यांनी आंघोळीचा आनंद घेतला. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पंढरीस जात असताना वेळापूरनजीक टप्पा येथील टेकडीवरून त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. त्यामुळे ते येथूनच पंढरपूरपर्यंत धावत सुटले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे वारकरी तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून येथून धावतात. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक येथील टेकडीवर गर्दी केली होती.त्यानंतर पालखी  पेराचीकुरोली च्या दिशेने मार्गस्थ झाली आजचा मुक्काम पेरचिकूरोली येथे असणार आहे .बुधवारी सकाळी वाखरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूर तालुक्यात दाखल झाला आहे . पंढरपूर पोहचण्यासाठी आता फक्त 2 दिवस राहिले आहे.त्यामुळे वारकऱ्याला भेटायची ओढ लागली आहे. 

    

                      पालखी सोहळ्यात  शिस्त महत्त्वाचीङ्घ   पालखी सोहळा हा शिस्तीसाठी प्रसिद्ध आहे.चोपदार हा अतिशय महत्त्वाची भूमिका पालखी सोहळय़ात बजावतो. त्याच्याच इशाऱयाने पालखी सुरू होते, विसावते. पालखी सोहळय़ात कुणाची मौल्यवान वस्तू हरवली तर ती चोपदाराकरवी परत मिळते. पहाटे ४ ते ४.३० च्या सुमारास दिंडय़ामधील वारकरी प्रातःकालीन स्नानादी विधी उरकतात. सकाळी ६.६.३० ला पालखी निघते. ह्यपुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामह्ण असा गजर पालखी उचलताना होतो. मग जय जय रामकृष्ण हरि सुरू होते. रूप पाहता लोचनी। सुख झाले हो साजणी हा रूपाचा अभंग होतो नंतर मंगलचरणाचे अभंग होतात. त्यानंतर भूपाळय़ा, वासुदेव, आंधळे, पांगळे, संकीर्ण अभंग, विशिष्ट वारांचे अभंग, हरिपाठाचे अभंग होतात. हरिपाठ संपतो त्यावेळी मुक्कामाचे ठिकाण येते. मग विसावा पुन्हा रात्री कीर्तन, हरिजागर!

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा