शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: सुषमा अंधारेंविरोधात राज्यभर गुन्हे दाखल करणार; माफीनाम्यानंतरही विश्व वारकरी संघ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 19:35 IST

Maharashtra Politics: राज्यातील गावोगावच्या विश्व वारकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांना सुषमा अंधारेंच्या विरोधात तक्रार देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. संतांच्या बाबतीत केलेल्या विधानासंदर्भात सुषमा अंधारे यांच्याविरोधात राज्यभर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. संतांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून विश्व वारकरी संघ चांगलाच आक्रमक झाला आहे. या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी माफी मागितली आहे. 

सुषमा अंधारे यांनी भगवान श्रीकृष्णाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने महानुभाव संप्रदायात संतापाची लाट असून अंधारे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ भगवान श्रीकृष्णासमोर घेण्याची मोहीम गावोगावी राबवली जाणार आहे. याची सुरुवात औरंगाबाद येथील महानुभाव आश्रमातून झाली आहे. यानंतर आता विश्व वारकरी संघाकडूनही संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 

विश्व वारकरी संघ राज्यभर गुन्हे दाखल करणार

वारकरी संतांच्याबाबत वक्तव्यानंतर काल सुषमा अंधारे यांनी माफी मागितली असली तरी यावर वारकरी संप्रदायाचे समाधान झालेले नसून त्यांचे विरोधात राज्य सरकारने गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्व वारकरी संघाच्या तुकाराम चौरे महाराज यांनी केली आहे. तसेच राज्यभर सुषमा अंधारे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी विश्व वारकरी संघाने सुरु केल्याचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज देशमुख यांनी जाहीर केले आहे. वारकरी संप्रदायाचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून राजकीय नेत्यांनी वारकरी संप्रदायातील संतांवर अशा पद्धतीची वक्तव्ये केली तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशारा विश्व वारकरी संघाचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज यांनी दिला आहे. तसेच राज्यातील ३६ जिल्हे आणि २७० तालुक्यात पसरलेल्या या संघटनेने आपल्या गावोगावच्या पदाधिकाऱ्यांना सुषमा अंधारे यांच्या विरोधात तक्रार देण्याच्या सूचना दिल्याचे जगन्नाथ महाराज देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, हिंदू देवदेवता आणि वारकरी संतांच्या अपमाना नंतर शांत कसे राहायचे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वारकरी संप्रदायाची नेहमीच आधार आणि आदरयुक्त होते मात्र आता हिंदू आणि वारकरी संप्रदायाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या अशा विकृती उद्धव ठाकरे यांनी  पटकन पक्षातून काढून टाकाव्यात, अशी मागणी महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांनी केली आहे. दुसरीकडे, वारकरी संत आणि थोर महापुरुषांच्याबाबत वारंवार अपमानजनक वक्तव्ये येत असताना राज्य शासनाने याच्या विरोधात कडक कायदा करण्याची मागणी वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे ज्ञानेश्वर जळगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारे