शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रुक्मिणी माते, आम्हाला माफ कर...!; मूर्तीच्या चरणांवर लावलेला वज्रलेप दोन वर्षांतच निघाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 05:32 IST

बाप आणि आई, माझे विठ्ठल रखुमाई...लाखो भाविकांचा असा भाव ज्याच्यावर आहे, त्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या सुरक्षेसाठी दोन वर्षांपूर्वी वज्रलेप केला.

पंढरपूर :

बाप आणि आई, माझे विठ्ठल रखुमाई...लाखो भाविकांचा असा भाव ज्याच्यावर आहे, त्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या सुरक्षेसाठी दोन वर्षांपूर्वी वज्रलेप केला. परंतु, रुक्मिणी मातेच्या चरणांवरील वज्रलेप आताच निघू लागला आहे. २३ व २४ जुलै २०२० रोजी केलेला वज्रलेप सुमारे ८ वर्षे टिकेल, असे सांगितले होते. परंतु रुक्मिणी मातेच्या चरणांवरील वज्रलेप निघाल्याचे दिसून आले. त्यामुळे रुक्मिणी मातेच्या चरणांवर लीन होताना ‘माते आम्हाला माफ कर...’अशीच प्रार्थना वारकरी करीत आहेत. 

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला होता. आतापर्यंत चार वेळा पुरातत्त्व विभागाकडून मूर्तीवर हे विविध प्रकारच्या रसायनांचे लेपन करण्यात आले होते. मात्र, दोन वर्षात रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेप निघू लागला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने दोन वर्षे पदस्पर्श दर्शन पूर्णपणे बंद होते. याच काळात २३ आणि २४ जुलै २०२० रोजी पुरातत्त्व विभागाने विठ्ठल मूर्तीवर आणि रुक्मिणी मातेच्या पायावर सिलिकॉनचा लेप दिला होता. तो ७ ते ८ वर्षे तसाच राहील, असा दावा करण्यात आला होता. परंतु दोन वर्षांनंतर गुढीपाडव्याला पुन्हा श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श दर्शनास सुरुवात झाली आणि आता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

मूर्तीची झीज होत असल्याने पंचामृत अभिषेक बंद केला होता. रुक्मिणी मातेची मूर्ती शाळीग्राम दगडाची असून ती अतिशय गुळगुळीत आहे. या पायावर दरवेळी वज्रलेप केला जातो. आता वज्रलेपाचे तुकडे पडले आहेत. 

यापूर्वीही लेपन...श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धन होण्यासाठी १९९८, २००५, २०१२ आणि चौथा वज्रलेप २३ जुलै रोजी पुरातत्त्व विभागाचे उपाधीक्षक आणि रसायनशास्त्र तज्ज्ञ श्रीकांत मिश्रा यांच्या टीमने पूर्ण केला आहे.

मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधला आहे. तज्ज्ञ मंडळीशी चर्चा करून दोन्ही मूर्ती संवर्धनासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील.- गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती

टॅग्स :Pandharpurपंढरपूर