शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा; लेखापरीक्षण अहवालातील धक्कादायक निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 10:50 IST

या अहवालामुळे विठ्ठल मंदिर समितीच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

नागपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा लाडू प्रसाद हा निकृष्ट असल्याचा धक्कादायक अहवाल लेखापरीक्षणात नोंदवण्यात आला आहे. नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 'श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती'चा वर्ष २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. या अहवालातून लाडू प्रसादाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालामुळे विठ्ठल मंदिर समितीच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

अहवालामध्ये प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूसंदर्भात गंभीर बाबी समोर आल्या आहेत. प्रसाद म्हणून देण्यात येणारा लाडू करण्याचे काम बचत गटाला देण्यात आले होते. बचत गटाकडून ज्या ठिकाणी लाडू तयार केले जातात, ती जागा अस्वच्छ आहे. तसंच लाडू सुकवण्यासाठी कळकट ताडपत्री वापरली जात असल्याचे निदर्शनास आल्याचे अहवालात म्हटले आहे.सध्या मंदिर समिती स्वतः लाडू प्रसाद तयार करून त्याची विक्री करते. निकृष्ट दर्जाचा लाडू बनवणाऱ्या व्यक्तींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

याचबरोबर, लाडूच्या पाकिटावर जे घटक नोंदवले जातात, ते वापरले जात नाहीत. लाडू बनवण्यासाठी शेंगदाणा तेल वापरण्याची अट कंत्राटामध्ये नमूद आहे, प्रत्यक्षात सरकीचे तेल वापरले जाते. विठ्ठलाचा प्रसाद म्हणून तीन लाडूंचे पाकीट २० रुपयांना विकले जाते. मात्र, या लाडूच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्यास अपाय होऊ शकतो. होणाऱ्या परिणामास लाडू बनवणाऱ्या बचत गटाबरोबर मंदिर समितीची सुद्धा तेवढीच जबाबदारी असेल, असा इशारा लेखापरीक्षण करणाऱ्या पुण्याच्या ‘बीएसजी अँड असोसिएट्स’ने नोंदवला आहे.

दुसरीकडे, विठ्ठलाचा प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू आता राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्रमाणित करून घेत आहोत. त्यामुळे प्रसादामध्ये ज्या काही त्रुटी अहवालात नोंदवल्या आहेत, त्या आता राहणार नाहीत, असे पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PandharpurपंढरपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर